जत,प्रतिनिधी: जतचे तीनवेळा आमदार राहिलेले माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या शुक्रवारी 84 व्या वाढदिनी शुभेच्छाचां वर्षाव करण्यात आला. अगदी आंशी ओंलाडलेले काका आज शुभेच्छा स्विकारताना भावूक झालेले पाह्याला मिळाले,राजकारणात अनेकवर्षे सत्ता किंबहुना तालुक्याचे नेतृत्व स्वता:कडे असताना जोडलेले सामान्य माणसे,मोठे अधिकारी, नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गराडा आज पुन्हा मागील कार्यकीर्दीचा उजाळा देणारा ठरला.शुक्रवारी सकाळ पासून सनमडीकर काका यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी होती.कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत,माजी सभापती प्रकाशरावजी जमदाडे, तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडक,नाना शिंदे, तुकाराम माळी,भुपेंद्र कांबळे यांनी फेडा शाल,व हार घालून दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी दिवसभर सनमडी, माडग्याळ, जत येथील संस्थात काकाचा भव्य सत्कार करण्यात आला.दरम्यान बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,पोपट चव्हाण,विजय सनमडीकर, सह सांगली जिल्ह्यातील अनेक राजकीय,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अने मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर सनमडीकर काका यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी केक कापून शुभेच्छा दिल्या, संस्थातील सर्व विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त जेलेबी वाटप करण्यात आले.
जत,माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी थेट भेटून शुभेच्छा दिल्या.













