जत,येळवी,वार्ताहर: खैराव ता. जत येथे घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्नातील दरोडेखोरांना सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.पाच पैंकी दोन पळाले तीन दरोडेखोरांना पकडून जमावाकडून चोप देऊन जत पोलिसांच्या ताब्यात दिले.मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सततच्या चोरीच्या घटनेने वैतागलेल्या नागरिकांनी सतर्कता दाखविण्यास सुरू केली आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात लोंकाच्या प्रंसगावधाना मुळे जत व येळवी अशा दोन घटनेत सहा दरोडेखोरांना पकडण्यात आले आहे.प्रकाश शिवाजी चव्हाण (वय-28,रा.इंदिरानगर झोपडपट्टी जत),बादल बाळू शिंदे( वय-23,रा.खडकी ता.मंगळवेढा),अन्य एक अल्पवयीन आहे.दोघांनी पलायन केले आहे. त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून तीन चाकू,मोटारसायकल(क्र.एमएच-10,/
खैराव (ता.जत) येथील ग्रामस्थांना टोणेवाडी येथे बुधवारी रात्री 12.30 वाजता बाबू बेरगळ यांच्या घरात चोर घुसलेचे समजले होते.पण दंगा झाल्याने ते तेथून पळाले.टोणेवाडी येथील चोरीचा डाव फसल्याने ते खैराव येथील रामचंद्र विठ्ठल पाटील यांच्या वाड्याचा दरवाजा मोडून आत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला.दरवाजाला बाहेरुन कडी व कोयडा खराब झाल्याने पाटील यांनी आतून नायलनच्या दोरीने बांधलेला होता.दोरी कापून आत दरोडेखोर आत घुसले असता जाग आली.त्यांनी फोनवरून गावातील काही लोकांना कल्पना दिली.घरामध्ये शिरलेल्या चोरट्यांनी रामचंद्र पाटील यांना चाकूने हल्ला केला, त्यांनी तो वार चुकवला तोपर्यंत खैराव ग्रामसुरक्षा दलाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी बाहेरून गराडा घालून तिघांना पकडले.जमाव बघून दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.तिघांनी नागरिकांनी धाडसाने पकडले.सशयिंत आरोपी मोटरसायकल वरुन येत असताना मोटारसायकलची लाईट बंद करून खैराव गावात प्रवेश केला होता. ग्रामस्थानी विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली.ग्रामस्थांनी हातपाय बांधून ग्रामपंचायतीसमोर उभे केले होते.जमावाने चांगलाच चोप दिला.घटनेची जत पोलिसात नोंद असून याबाबतची फिर्याद खैरावचे उपसरपंच रामचंद्र पाटील यांनी दिली.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे हे करीत आहे.गेल्या दोन महिन्यांपासून तालुकाभर घरफोडीचे सत्र सुरू आहे.
यापूर्वी येळवी येथील शंकर पाटील यांच्या घरी व अशोक(पिंटू)टोणे खैराव,कमळाबाई जिपटे खैराव यांच्या घरात चोरी झाली होती.या परिसरात वारंवार चोरीची प्रकार घडतात.येळवी व खैराव हे सोलापूर जिल्हाच्या सीमावर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी औटपोस्ट करण्याची मागणी जनतेतून होत आहे.व रात्री पेट्रोलिंग (गस्त)घालणेची मागणी होत आहे.
फोटो:
> खैराव ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडलेल्या चोरट्यांना असे बांधून ठेवले.चोरट्यांचे तीन चाकू,दुचाकी, चोरट्याना पकडण्यासाठी जमलेला जमाव








