संख | बालगावमध्ये आज विश्वविक्रमी योग |

0

संख,वार्ताहर: बालगाव ता.जत येथील गुरूदेव आश्रम आयोजित योग-उत्सवानिमित्त सुर्यनमस्कार कार्यक्रमाची तयारी पुर्ण झाली असून आज ता.21 ला आंतरराष्ट्रीय योगदिनी होणाऱ्या या कार्यक्रमात एक लाख लोंकाच्या उपस्थितीचे गिनिज बुक वर्ड रेकार्ड होणार आहे.अशी माहिती आश्रमाचे अंमृतानंद महास्वामीजीनी दिली.

कार्यक्रमासाठी दोनशे एकर जागेत पुर्ण तयारी झाली आहे. पुर्ण गाऊंडचे सपाटीकरण करण्यात आले आहे.त्यावर सुर्यनमस्कार करण्यासाठी मॅट टाकण्यात आले आहे.एकाचवेळी एक लाख लोक उपस्थित राहतील अशी सोय केली आहे. सर्वांना जेवनाची सोय व्हिआयपी जेवन व्यवस्था, प्रेस,पोलिस बंदोबस्त,पुस्तक विक्री सेंटर,आरोग्य,योगाच्या माहितीसाठीचे वेगवेगळे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.ज्ञानयोगी सिध्देश्वर स्वामीजी,श्री गुरूदेवाश्रम बालगाव मठाचे अंमृतानंद महास्वामीजी,

Rate Card

महसूल मंत्री चंद्रकात पाटील, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत सह,महाराष्ट्र, कर्नाटकतील अनेक मंत्री,आमदार, माजी आमदार, सभापती, जि.प.सदस्य, व आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरासाठी अधात्मातील गुरूवर्य  सिध्देश्वर महास्वामीजी, वेदांत केसरी मल्लीकार्जून स्वामीजी, महाराष्ट्र व  कर्नाटक राज्यतील मंत्री  इत्यादी मान्यवर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सिमाभागातील एक लाख विद्यार्थी, पदाधिकारी, आणि नागरिक या सुर्यनमस्कार योग साधनेसाठी उपस्थित राहणार आहेत.असे सांगून अंमृतानंद महास्वामी पुढे म्हणाले की , या उत्सवातील उपस्थित एक लाख लोकांची सर्वप्रथम नोंदणी करुन त्यानंतर गिनिज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणी होणार अाहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी विजय काळमपाटील यानी पुढाकार घेतला आहे. हा कार्यक्रम गुरूवर्य सिध्देश्वर महास्वामीजी व वेदांत केसरी मल्लीकार्जून स्वामीजी यांच्या सानिध्यात,होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की,महाराष्ट्र व कर्नाटक सिमेवर रहात असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकाना योगाचे महत्व कळावे,योग साधनेचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उद्देशाने या योग-उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सिमावर्ती भागात असणाऱ्या कर्नाटकातील तिन तालुक्यात या योग उत्सवाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला आहे. प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुंलाना विशेष योग प्रशिक्षित शिक्षकाकडून  प्रशिक्षण दिले गेले आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात एक केंद्र बनवून त्या केंद्रात एका योग प्रशिक्षित शिक्षकाद्वारे प्रशिक्षण दिले आहे.सिमावर्ती कर्नाटकातील  प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पत्तीस हजार विद्यार्थी व पंधरा हजार नागरिक या योग उत्सवात सहभागी होणार आहेत. असा दावा त्यांनी यावेळी केला.

    गतवर्षी 80 हजार नागरिकांची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात यापेक्षाही जादा लोक उपस्थित होते . परंतु त्यांनी आपले नांव नोंद केले नसल्यामुळे ते  रेकाँर्डवर आले नाहीत. कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या नागरीकासाठी गावातून प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर नाष्टा व जेवणाची सोय मोफत करण्यात आली आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून  संपूर्ण देशभर प्रचार व प्रसार करण्यासाठी आणि निरोगी नागरिक घडविण्यासाठी हातभार लावावा असे अवाहन अमृतानंद महास्वामी यांनी केले आहे.

बालगाव (ता.जत) येथे ग्रामीण ऐतिहासिक योग-उत्सवाची तयारी सुरू आहे. स्टेज,गांऊडचे मॅट टाकण्याचे काम बुधवारी सुरू होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.