येळवी,वार्ताहर: ओंकार स्वरूपा फोंडेशन संस्था, येळवी.ता.जत यांच्या वतीने संस्थेचे सदस्य व येळवीचे विद्यमान उपसरपंच सुनिल अंकलगी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 20 जुन 2018. रोजी, सकाळी दहा ते सायकांळी पाच पर्यत पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, व रेशन कार्ड मध्ये नावाची नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे.त्याबरोबर येळवी मधील विशेष गुण मिळवुन 10 वी,12 वी तसेच इतर परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा “गुणगोरव सोहळा”आयोजित केला आहे.
या शिबीरामध्ये शासकीय अधिकारी यांच्या मार्फत- संजय गांधी योजना,श्रावणबाळ योजना, इंदीरा गांधी राष्ट्रीय वृधापकाळ योजना (केंद्र शासन),राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य अनुदान योजना,आम आदमी विमा योजना, व बांधकाम कल्याण कामगार या योजनाविषयीची माहिती या शिबिरामध्ये देऊन, योजनेच्या संबंधित व्यक्तीला त्या योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
तरी ज्या व्यक्तीना खालील योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या व्यक्तीने कागदपत्रे घेऊन येळवी ग्रामपंचायत जवळ उपस्थित रहावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



