दरीबडची | विकास कामातून दरीबडची मतदार संघ “ऑयडॉल” बनवू : सरदार पाटील |
दरीबडची,वार्ताहर : आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दरीबडची मतदार संघातील मागासवर्गीय समाज,दलित वस्तीसह संपुर्ण मतदार संघात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा निधी आणून मतदार संघ ऑयडॉल बनवू असे प्रतिपादन जि.प.सदस्य सरदार पाटील यांनी केले.
ते दरीबडची येथे 20 लाखाचा निधीतून होत असलेल्या दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत पेग्विन बॉल्क,डांबरीकरण, व गटारी दुरूस्ती कामाच्या उद्घाटन प्रंसगी बोलत होते.
यावेळी संरपच मोरडी,उपसंरपच चव्हाण, ग्रा.प.सदस्य आमसिध्द शेंडगे, युवा नेते आंनदराव पाटील, सोसायटी चेअरमन लक्ष्मण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, दरीबडची जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वच गावात आमदार विलासराव जगताप, पंचायत समिती,जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत.जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाच्या योजनातून मतदार संघातील मागासवर्गीय समाज, दलित वस्त्या,विकास कामातून विकास प्रवाहत आणू,त्यादृष्टीने गावागावात कामे प्रस्तावित केली आहे, अनेक सुरू आहेत. मतदारांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून दरिबडची जिल्हा परिषद मतदार संघ विकास कामातून जिल्ह्यात ऑयडॉल बनवू असे शेवटी पाटील म्हणाले.

दरिबडची येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पेग्विन बॉल्क, डांबरीकरण, गटारी दुरूस्ती कामाचे उद्घाटन करताना जि.प.सदस्य सरदार पाटील व मान्यवर