जत | तालुक्यातील जि.प. शाळात पहिल्याच दिवशी फज्जा;शिक्षकाच्या कमतरतेमुळे हाजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय

0

दरिबडची : शालेय सुट्या संपून जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, शुक्रवारी (दि.15) शाळा सुरू झाल्या आहेत.त्यामुळे नव्याने शाळा गजबल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाची विद्यार्थी आणि पालकांनादेखील उत्सुकता आहे. नवीन गणवेश, नवी कोरी पुस्तके, नवे मित्र-मैत्रिणी आणि जुन्या मित्रांची भेट अशा उत्सुकतेच्या वातावरणात पुन्हा एकदा शाळेच्या परिसरात किलबिलाट झाला असून, सुमारे एक हाजार चिमुकल्यांनी शाळेत पहिले पाऊल ठेवले आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून, शासनाच्या परिपत्रकानुसार जत तालुक्यातील सर्वच शाळा शुक्रवारी सुरू झाल्या आहेत. शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्याने शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्याचे स्वागत केले गेले आहे. ग्रामीण भागात चिमुकल्यांच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते,तर शहरात अनेक शाळांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून मुलांच्या स्वागत केले.

Rate Card

शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेचे रंगरूप पालटले आहे. असंख्य शाळा नव्या रंगात रंगल्या आहेत तर शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या फुलांनी तसेच चित्रांनी सजविण्यात आलेल्या आहेत. शहरातील अनुदानित, विनाअनुदानित तसेच मान्यताप्राप्त शाळा 15 तारखेला सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील वीसवर शाळेत शिक्षकाचा वणवा आहे.तर सिंदूर शाळेत पहिल्या दिवसी शिक्षक न आल्याने विद्यार्थी शाळेबाहेर बसून होत्या.तर तालुक्यातील सुमारे 32 शाळा झिरो शिक्षक आहेत. तेथे एक दुसरा शिक्षक पाठवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.मोठ्या प्रमाणात रिक्त पदामुळे पहिल्या दिवशीच शाळाचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.