जत | सव्वा सात लाख रुपयाचे लोंखडी विद्युत पोल पळविले |

0

जत,प्रतिनिधी: जत शहरा लगत म्हैशाळ सिंचन योजनेच्या खलाटी पंपहाऊसला जोडणीसाठी सुरू असलेल्या विजेचे 7 लाख 20 हाजार रुपये किंमतीचे 36 लोंखडी पोल अज्ञात चोरट्यानीं लंपास केल्याची तक्रार कंत्राटदार सुभाष रावराणे यांनी जत पोलिसात दिली आहे.
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, जत-सांगली रोडकडेला जत पासून दोन किलोमीटर अंतरावर जत येथील महावितरणच्या सब स्टेशन मधून खलाटी पंपहाऊसला सुमारे पंधरा किलोमीटर विज जोडणीचे काम खाजगी प्रंशात सुभाष रावराणे रा.ऐेैरोली नवी मुबंई या कंत्राटदाराकडून सुरू आहे. त्यासाठी लागणारे पोल जत-सांगली रोडकडेला जत पासून दोन किलोमीटर अंतरावर टाकले आहेत.तेथे एकूण 70 पोल उतरण्यात आले होते.त्यांपैकी सुमारे 30 पोलची उभारणी झाली आहे. बाकी चाळीस पोल तेथे शिल्लक होते.दोन दिवसापुर्वी काही अज्ञात चोरट्यानीं त्यातील 32 पोल चोरून नेहले आहेत.एक पोलची वजन 450 किलोग्रम तर 22,500 रूपये किंमत आहे.इतके वजनदार पोल पळवून नेहल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोल वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून हे पोल नेहल्याची शक्यता फिर्यादीने व्यक्त केली आहे.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे. अधिक तपास पो.ह.वीर करत आहेत.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.