योगदिनाच्या योग-उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा: डॉ. रविंद्र आरळी

0
8

जत,प्रतिनिधी: बालगाव ता.जत येथील योग-उत्सवात निमित्त जनजागृत्ती करण्यासाठी आश्रमाचे अमृतानंद महास्वामीजी यांनी जत येथे एक दिवसीय योगाचे मार्गदर्शन केले.यावेळी भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी प्रमुख उपस्थितीत होते.यावेळी अंमृतानंद महास्वामीजीनी योगाचे प्रात्यक्षिक उपस्थित लोकांना दिले.
यावेळी बोलताना डॉ.रविंद्र आरळी म्हणाले,बालगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऐतिहासिक योग-उत्सवाचे आयोजन केले आहे. यात एक लाख जणांचा सुर्यनमस्कार करून वर्ल्ड रेकार्ड करायचे आहे.त्याचबरोबर योगाचे महत्व कळावे यासाठी ग्रामीण भागात या क्रार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परिसरातील शाळेतील विद्यार्थी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.योग-उत्सवाच्या पुर्व तयारीनिमित्त जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंमृतानंद महास्वामीजीनी योगासने,सुर्यनमस्काराचे प्रात्याक्षित करून मार्गदर्शन केले.

योग-उत्सवाच्या पुर्व तयारीनिमित्त जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here