जतेत दिव्यांगाच्या शिबिरास उंदड प्रतिसाद 1664 जणांची तपासणी : दिव्यांगासाठी जिल्ह्याला शासनाकडून 4 कोटीचा निधी

0

जत,प्रतिनिधी :  जिल्ह्यातील दिव्यांगाच्या शासन पाठिशी आहे.त्यांच्या उन्नती साठी शासनाकडून 4 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र शिबीरांचे आयोजन करून उपचार,तपासण्या व आवश्यक सामुग्री मोफत देण्यात येणार आहे.जत मध्ये आयोजित केलेल्या शिबिरांत 1 हाजार 664 दिव्यांगाची तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील यांनी केले.
जत येथे जि.प.शाळा न.1 मध्ये सोमवारी दिव्यांगासाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सभापती रवीपाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती मंगलताई जमदाडे,पं.स.सदस्या श्रीदेवी जावीर,आडव्याप्पा घेरडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.डि.जी.पवार उपस्थित होते.
रवीपाटील पुढे म्हणाले,दिव्यांगासाठी जिल्हाभर अभियान सुरू आहे. त्या माध्यमातून त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.प्रत्येक तालुक्यात त्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबीरात त्यांच्या तपासण्या करण्यात येतील.कर्णबंधीरासाठी श्रवणयंत्रे,दृष्टी अंधू असणाऱ्यांना सेन्सर बसविण्यात आलेली पांढरी काठी,अपंगांसाठी व्हिलचेअर,जयपूर फुट,सिथेंटिक बुट,आदी साहित्य मोफत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातून नोंदणी पुर्ण झाल्यानंतर सर्व साहित्य पंचायत समिती स्तरावर दिले जाणार आहे. जतमधील शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील 1 हाजार 664 दिव्यांग सहभागी झाले होते.त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यासाठी खास डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी या शिबिरात सहभागी झाले होते.

Rate Card

जत येथे जि.प.च्यावतिने आयोजित दिव्यांग शिबिरात आरोग्य व शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील व डॉक्टर्स

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.