जत | नाल्याचे पाणी रहदारीच्या मार्गावर गाळाने नाला सतत भरतोयं : गुहागर-विजापूर मार्गावरील प्रकार |

0

जत,(प्रतिनिधी): या काही वर्षांत जत तालुक्यातील अनेक गावे जतशी पक्क्या रस्त्यांनी जोडली गेली आहेत. जत शहरातून जाणारा मुख्य मार्ग म्हणजे विजापुर-गुहाघर या मार्गावर नियमित मोठी वाहतूक होत असते. पण या मार्गावर असलेला एक नाला पूर्णत: गाळाने बुजल्याने पावसाने पाणी वाट सोडून रस्त्यावर आले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून अपघात वाढले आहेत.
कराड,सातारा,पुणे,मुंबई व विजापूर,सह कर्नाटकतील अनेक मोठ्या शहराना जाणे सोयीस्कर झाल्याने या मार्गावर वाहतूक वाढली आहे. गुहागर-विजापूर मार्गावर जत शहरातून सातारा चौक ते विजापूर चौकापर्यत एक ते दोन किमी अंतरावर असलेल्या नाल्यावर गेल्या दहा वर्षापुर्वी गटारी बांधण्यात आल्या आहेत. त्यांची त्यांनतर दुरूस्थी न झाल्याने सदर गटारी खूपच ठेंगणा असल्याने नाल्यावर पावसाळ्यात पाणी साचून राहत होते. पण पाऊस ओसरताच काहीच वेळात नाल्याचे पाणी वाहून जात असे. पण सध्या ही गटार गाळाने पूर्णत: मुजला आहे. वाहून आलेल्या गाळासोबतच काडी कचरा गटारीच्या पायल्यांमध्ये फसल्याने नाल्याचा मुख्य मार्ग अवरुद्ध होऊन पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पाऊस झाल्यास या रस्त्यावर दीड ते दोन फुट पाणी साचून राहते. त्यामुळे गटारीतील गाळ स्वच्छ करून साचत असलेल्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी या मार्गावरील प्रवासी करीत आहेत.खरेतर या महामार्गला मोठी गटार बांधणे महत्वपुर्ण आहे. मार्गही अरुंद व धोकादायक बनला आहे. त्यात हे पाणी म्हणजे जादा धोका बनत आहेत. नाला बुजल्याने नाल्याचे पाणी प्रवाह सोडून रस्त्यावर पसरले आहे. पाऊस सुरूच असल्याने पाणी वाढतच आहे. रोडवरील पाणी वाहून जाण्यासही मार्ग नसल्याने ते साचून व बऱ्याच विलबांने कमी होत आहे. त्यामुळे वाहनांचे संतुलन बिघडते. त्यामुळे नाल्यातील गाळ स्वच्छ करणे गरजेचे झाले आहे. नाल्याची स्वच्छताच नाही,कित्येक वर्षांत या नाल्याची दुरूस्थी झाली नाही व सतत स्वच्छताही होत नाही. त्यामुळे सातत्याने गाळ साचून ही स्थिती येथे ओढावली आहे. संबधित विभागाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे अधोरेखित होत आहे.नाल्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांद्वारे केली जात आहे.

खड्डे भरल्याने काहीसा धोका कमी

Rate Card

या ठिकाणी काही दिवसापुर्वी मोठे खड्डे पडले होते.खड्ड्याचा घेर पाच फुटापर्यत खोल होता.लहान वाहने,दुचाकी चालविणे मरण

विजापूर-गुहागर मार्गावर केएम हायस्कूल नजिक रस्त्यावरून वाहणारे गटारीचे पाणी वाहन चालकांना अडचणीचे ठरत आहे.ठरत होते.मात्र सामाजिक कार्यकर्ते परशूराम मोरे यांच्या जागर फाऊडेंशनच्या वतीने मुरूम टाकून खड्डे भरल्याने काहीअंशी धोका ठळला आहे.मात्र पाण्यामुळे घसरगुंडी कुणाचा जिव घेईल सांगता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.