संख | पुण्यश्र्लोक अहिलादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी | www.sankettimes.com

0

संख,वार्ताहर: संख ता.जत येथे पुण्यश्र्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 293 वी जंयती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे भाजपचे स्टार प्रचारक गोंपीचंद पडळकर,जतच्या नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर,विवेक कोकरे,संखच्या संरपच मंगलताई पाटील, बिरा तांबे(पांढरेवाडी)आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रांरभी अाहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना गोंपीचंद पडळकर म्हणाले,पुण्यश्र्लोक अाहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे.त्यांचा कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तरूणांनी उन्नती करावी.
विवेक कोकरे म्हणाले,राजमाता जंयती फक्त एकाच समाजाची न राहता सर्वजणांनी एकत्रित येऊन सामाजिक एकता दाखवावी,महापुरषांच्या जंयत्या धागंडधिका करण्यासाठी नसून सामाज हितासाठी सामाजिक उपक्रम राबवून समाज परिवर्तन करण्यासाठी जंयती साजरी करावी.महापुरषांच्या कार्याची महती यानिमित्ताने समाजाला कळेल,अनेकांना प्रेरणा मिळेल असे नियोजन समाजमन बदलण्यास मदत करेलं असे शेवटी कोकरे म्हणाले,कार्यक्रमाचे नियोजन रासपचे काशिलिंग कोकरे,संखचे अप्पु दर्गाकर यांनी केले.यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सौ.काशिबाई टोणे,भानुदास व्हनमाने,सचिन व्हनमाने,जयवंत करे,तानाजी मोठे,जगंननाथ हक्के,तुकाराम बिराजदार,काशिलिंग कोकरे,मायाप्पा पडोंळकर,संतोष कोकरे,हनंमत गडदे,मलेश गडदे,मलेश मोठे,सुरेश पाटील,दिलीप वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Rate Card

संख येथे पुण्यश्र्लोक अहिलादेवी होळकर जयंती सोहळ्यात बोलताना भाजपचे स्टार प्रचारक गोंपीचंद पडळकर, बाजूस शुंभागी बन्नेनवर, विवेक कोकरे व मान्यवर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.