जत | विवेक कोकरेंना मिळाली अनोखी भेट;संयुक्तिक जंयती व वाढदिवसानिमित्त सन्मानपुर्वक चारचाकी गाडी प्रधान |

0
10

जत,प्रतिनिधी:जत येथे पहिल्यांदाच यशवंत युवा सेनेच्या वतीने संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.जंयतीचे औचित्य साधत यशवंत सेनेचे संस्थापक विवेक कोकरे यांना चारचाकी गाडी प्रधान करण्यात आली.
कोन आहेत विवेक कोकरे.
खरंतर दोन वर्षांपूर्वी म्हणजे 19 जून 2016 रोजी सांगोला तालुक्यात समाजाची तळमळ असणाऱ्या युवा वर्गाने एकत्रित येऊन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेचे प्रमुख म्हणून समाजासाठी अविरतपणे, निस्वार्थीपणे झटणारे झगडणारे नेतृत्व असलेल्या एका युवकाची अर्थातच निर्भीड वक्ते विवेक कोकरे यांची निवड करण्यात आली. विवेक कोकरे यांनी तळागाळातील तळमळीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जवळपास अर्धा महाराष्ट्र पिंजून काढला,परंतु सर्व गोष्टींचे सोंग करता येते,पण पैशाचे सोंग करता येत नाही अशीच परिस्थिती संघटनेच्या आणि संघटना प्रमुखांच्या वाट्याला आली. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विविध तालुक्यातून विवेक कोकरेना संघटना वाढीसाठी विस्तारासाठी फोन यायचे पण काय करणार? खिशात दीड-दमडी नसताना तोंड वाजवून तर कुठे जाता येत नव्हते आणि हेच कारण संघटनेच्या वाढीसाठी बाधा ठरत होते. एखाद्या दुसऱ्या कार्यकर्त्यांने दिले तर एखाद्या कार्यक्रमास जाता येत होते आणि एखादी संघटनेची बैठक पार पडत होती. कधी जनरल डब्यातून रेल्वेचा प्रवास तर कधी महाराष्ट्राची लाल परि म्हणून ओळखली जाणारी एसटी बसचा प्रवास कधीकधी बस मिळाली नाही. म्हणून बस स्टँडवर रात्र काढावी लागायची तर कधी कुठे एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम ठोकायचा दुसऱ्या दिवशी पुन्हा तो प्रवास सुरुच… संघटना चालवायला पैसा लागतो ते फक्त लोकांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहचण्यासाठी… परंतु पैसाच नसेल तर तिथपर्यंत पोहचणार कसे? समाजाचे प्रश्न सोडवणार कसे? म्हणून जत तालुक्यातील युवक नेते सचिन मदने नावाचा एक वीसेक वर्षाचा युवा कार्यकर्ता पुढे सरसावला आणि त्याने दिलदार मनाने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 18 लाखाची XUV500 ही गाडी द्यायचे ठरवले. खरंतर निमित्त होते कोकरे साहेबांच्या वाढदिवसाचे परंतु संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करून सर्व महापुरुषांचा इतिहास शाहीर डॉ.अमोल रणदिवे यांच्या पोवाड्यांच्या माध्यमातून समाजाच्या मनामनापर्यंत पोहचवला आणि विवेक कोकरे यांचा वाढदिवस म्हणून कोणालाही कळू न देता विश्वास बसणार नाही अशी भेट त्यांनी कोकरे साहेबांना दिली.
         विवेक कोकरे यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या वाढदिवसादिवशीच म्हणजेच होळकरशाहीच्या स्थापनेदिवशी जो विशेष सन्मान झाला हा सन्मान यशवंत युवा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि निस्वार्थीपणे समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या झगडणाऱ्या आणि संघटनेवरती आणि समाजावरती प्रेम करणाऱ्या सर्वांचा सन्मान होता. जो निस्वार्थीपणे समाजासाठी झटतो आणि झगडतो, समाजासाठी लढतो त्यामुळे लोक त्याच्या कार्याची कर्तृत्वाची पोहचपावती देतात आणि अगदी वयाच्या पंचविसाव्या विवेक कोकरे यांना त्यांच्या कामाची पोहचपावती मिळाली. आजपर्यंत खिशात पैसा नसल्याने त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरता आले पण आता त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचावे म्हणून त्यांना चारचाकी दिली आहे आता कोकरे साहेब कुठे आणि कधीही थांबणार नाहीत जिथे कुठे समाजावरती अन्याय होत असेल तिथे तिथे कोकरे  समाजाच्या हाकेला धाऊन येणार आहेत. अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करायला समाजाच्या बाजूने लढण्यासाठी आता त्यांना गती प्राप्त झाली असून आता महाराष्ट्र राज्यभर फिरून विखुरलेल्या आणि विस्कटलेल्या धनगर समाजाला एकत्रित करणार आहेत. यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघनेच्या बांधणीसाठी दिवसरात्र एकत्रित करून अख्खा महाराष्ट्रभर पिंजून काढणार  आहेत.

जत: येथे यशवंत सेनेचे संस्थापक विवेक कोकरे यांना चारचाकी गाडी प्रधान करताना माजी आमदार प्रकाश शेंडगे,सचिन मदने व मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here