या कारणामुळे प्रेक्षकांना आवडत आहे ‘लगी तो छगी’

0
4

प्रत्येक सिनेमाचं आपलं नशीब असतं असं म्हटलं जातं. ज्या सिनेमाचं नशीब जोरदार तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोच. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘लगी तो छगी’ या सिनेमाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक प्रोमोज, अनोखी मांडणी, आजच्या जमान्यातील संवाद, धडाकेबाज कथानक आणि नेत्रसुखद सादरीकरण यामुळे ‘लगी तो छगी’ या सिनेमाने अल्पावधीत आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं आहे.
दिग्दर्शक शिवदर्शन साबळे यांनी ‘लगी तो छगी’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यासोबतच निर्माते दिप्ती विचारे, स्वाती फडतरे आणि अजित पाटील यांच्या जोडीने निर्मितीसुद्धा केली आहे. बंधू हेमराज साबळेच्या साथीने लेखन करीत शिवदर्शनने चौफेर कामगिरी केली आहे. ‘लगी तो छगी’च्या निमित्ताने कॅामेडी-सस्पेंस-थ्रिलर हा जॅानर हाताळताना सिनेमाला पूर्णपणे वेगळी ट्रीटमेंट देण्याचा शिवदर्शनने केलेला प्रयत्न यशस्वी झाला आहे. त्यामुळेच पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तरूणाईला हा सिनेमा खूप आवडत आहे. यासोबतच मध्यमवयीन आणि ज्येष्ठांनाही या सिनेमाच्या मांडणी आणि कथानकाने भुरळ घालत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here