जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रूवारी-मार्च 2018 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. जाहिर झालेल्या आॅनलाईन निकालानुसार जत तालुक्याचा निकाल 91.25 टक्के लागला असून, बारावी परिक्षेच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे.तालुक्यातील निकालात श्री.रामराव विद्यामंदिर,हायस्कूल अॅन्ड ज्यू कॉलेचा निकाल 82.68 टक्के लागला. परिक्षेस बसलेल्या 369 पैंकी 305 विद्यार्थी पास झाले आहेत.
शाळेचे यशस्वी पहिले पाच विद्यार्थी प्रथम-विभागून,ओंकार प्रमोद हंकारे,श्रेया प्रविणकुमार लांवड(दोंघानाही 97.80 टक्के),द्वितीय श्र्वेता भारत रुपनूर(97.60 टक्के),तृत्तीय रुषीराज चंद्रकांत सांवत,सृष्टी विजयकुमार नाईक(दोघींना 95.80टक्के),चौथे वैष्णवी तानाजी चव्हाण,प्रसाद राजेंद्र गुट्टे (दोंघानाही 95.60टक्के),पाचवे-संदेश सुभाष मुंजे,अमोल पारिस माने(दोघांनी 95.40 टक्के)यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिंनदन होत आहे
Home Uncategorized जत | दहावी परिक्षेचा जत तालुक्याचा निकाल 91.25 टक्के; रामराव हायस्कूलचे विद्यार्थी...





