जत,प्रतिनिधी:
जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ प्रभाकर वाकुडे यांची पुणे येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर येथे पदोन्नती होवून बदली झाली आहे. तर जत येथे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शर्मिष्ठा कमलेश वालावलकर यांची नियुक्ती झाली आहे.महाराष्ट्र पोलीस दलात महत्त्वपूर्ण 96 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे गॅजेट शुक्रवारी रात्री उशिराने बाहेर पडले. या वर्षातील सर्वात मोठे बदल्यांचे सञ सूरू झाले आहे.वालावलकर या अगोदर सोलापूर येथे कार्यरत होत्या.त्या जतचा चार्ज घेतील.





