उमदीत कॉग्रेस विरूध राष्ट्रवादी-भाजपा युक्तीत तुल्यबंळ लढत | www.sankettimes.com

0

बेंळोडगी, वार्ताहर: उमदी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दुरंगी चुरसीची लढत होत आहे. थेट संरपच व 17 सदस्यसाठी 36 जण नशीब आजमावत आहेत.थेट संरपच पदासाठी कॉग्रेस कडून निवृत्ती शिंदे यांच्या पत्नी वर्षा शिंदे निवडणूक लढवीत आहेत तर राष्ट्रवादी,भाजपा युक्तीच्या गंगाबाई सिद्राम तळ्ळी मैदानात आहेत.
पुर्व भागातील मोठी ग्रामपंचायत म्हणून परिचित आहे. अनेक तालुका, जिल्हास्तरावर काम करत असलेल्या राजकीय नेत्यांची कर्मभुमी उमदी असल्याने तालुक्याचे लक्ष या निवडणूकीकडे लागले आहे.भाजप-राष्ट्रवादी कॉग्रेस युक्ती व कॉग्रेस असा थेट सामना होत आहे. कॉग्रेसचे ताकतवान नेते निवृत्ती शिंदे व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य अॅड.चन्नाप्पा होर्तीकर,भाजप नेते संजय तेली यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.थेट संरपच निवडीमुळे टोकाचा प्रचार सुरू आहे. थेट मतदारांच्या भेटी,प्रचार सभा,कोपरा सभा,रॅलीने गाव दुमदुमले आहे.उमदीतील चर्चेत चेहरा असणारे कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांच्या पुढे राष्ट्रवादी व भाजपच्या युक्तीने आवाहन उभे केले आहे.निवृत्ती शिंदे गत दहा वर्षापासून समाज कार्यात कार्यरत आहेत.पाणी संघर्ष समितीचे महत्वाचे नेते म्हणून त्यांनी मोठे काम केले आहे.म्हैशाळ सिंचन योजनेला निधी मिळावा म्हणून उमदी ते सांगली पदयात्रा काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता.जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीत त्यांच्या नेतृत्वाला मोठे वलयं प्रात झाले आहे. येथील जि.प.सदस्य विक्रम सांवत,पं.स.सदस्य सौ. लत्ता कुलोळ्ळी ह्या कॉग्रेस सदस्यांना निवडून आणण्यात महत्वपुर्ण भुमिका बजावली होती.त्यामुळे निवृत्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे पारडे जड आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते चन्नाप्पा होर्तिकर यांच्या कुंटुबियांचे उमदीत मोठे कार्य आहे.ते स्वत: दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते.त्यांच्या बहिण रेश्माक्का होर्तीकर ह्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्यास संधी मिळाली होती.त्याचबरोबर उमदीवर गेल्या अनेक वर्षापासून होर्तीकर कुंटुबियाचे निर्विवाद वर्चस्व आहे.त्याचबरोबर भाजपचे तरूण नेते संजय तेली यांनी अल्पावधीत लोकहिताची कामे करत मजबूत गट तयार केला आहे.आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून त्यांनी उमदीसाठी विकास कामे खेचून आणली आहेत. या दोन्ही नेत्यांच्या एकत्रित ताकदीने पॅनेल मजबूत झाले आहे. उमदीतील अनेक वर्षे सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांना विकास साधता आला नाही,आम्हाला सत्ता द्या उमदीला विकासप्रवाहात आणू असे म्हणत कॉग्रेसकडून प्रचार सुरू आहे.तर उमदीसाठी जिल्हा,तालुका व स्थानिक निधीतून आतापर्यत मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे. त्याचबरोबर भविष्यातील विकासकामासाठी पुन्हा सत्ता द्या असे आवाहन राष्ट्रवादी,भाजपकडून करण्यात येत आहे.

Rate Card

उमदी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रचार रंगतदार स्थितीत आला आहे. कॉग्रेस उमेदवारांनी घरोघरी जात मतदारांची भेट घेत प्रचार सुरू केला आहे. आपल्या पँनेलचे महत्व, व विकासासाठी मते देण्याचे आवाहन ते करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.