जत | 45 दिवसांचं तुफान थंडावले! वॉटर कप स्पर्धा | www.sankettimes.com

0

जत  : गेल्या 45 दिवसांपासून सुरू असणारं वॉटर कप स्पर्धेचं तुफान मंगळवारी मध्यरात्री 12 वाजता संपले. जत तालुक्यातील पाणी फौंडेशनच्या कामाची अगदी राज्यपातळीवर दखल घेतली गेली.दस्तूखुद्द मुख्यंमञी देवेंद्र फडणवीस यांनी जत दौरा करत आंवढी व बागलवाडीला भेट देत नागरिकांचे कौतुक केले. त्यामुळे या दोन गावातील नागरिकांनी मोठे काम केले आहे. स्पर्धेत तालुक्यातील शंभरहून अधिक गावांनी न थकता व उन्हाची पर्वा न करता श्रमदान केले आहे. हजारो लोकांच्या श्रमदानातून उभं राहिलेलं काम कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा वाढवून जाणारं ठरणार आहे.अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून राज्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला प्रतिसाद अल्पसा लाभला; पण या स्पर्धेमुळे लोकांना पाण्याचे महत्त्व समजून आले. पहिल्यावर्षी जत तालुक्यातील बागलवाडी गावाने प्रथम क्रमांक मिळविला. बागलवाडीचा आदर्श घेत इतर अनेक गावांनी दुसऱ्या वर्षीच्या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामधून  डीपसीसीटी, नालाबांध, ओढ्यातील गाळ काढणे अशी कामे झाली. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत झाली.  या गावातील कामामुळे कोट्यवधी लिटरचा पाणसाठा होत आहे. त्यामुळेच जमिनीची पाणीपातळी वाढली
आहे. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात अनेक गावांना पाण्यासाठी टँकर सुरू करायला लागायचा. पाणीपातळी वाढल्याने अनेक गावांचे टँकर बंद झाले आहेत.कायम उन्हाळ्यात 80 वर टँकर लागणारा तालुका टँकर मुक्त झाला आहे. ही सर्व किमया जलसंधारणाचीच आहे. तिसऱ्या वर्षी स्पर्धेतही जत तालुक्यांतील शंभरहून अधिक गावे सहभागी झाली आहेत. दि.8 एप्रिलपासून संबंधित गावात श्रमदानाचं तुफान आलं होतं. पहाटेपासून रात्रीपर्यंत लोकांची कामे सुरू होती. मंगळवारी रात्री बारापर्यंतच स्पर्धेचं हे तुफान राहणारआहे. यावर्षीही या स्पर्धेंतर्गत जलसंधारणाचे मोठं काम झालं आहे.
अधिकाऱ्यांनी उचलले दगड…
जत तालुक्यात वॉटर कप स्पर्धेंतर्गत मोठं काम झालं आहे. याला कारण म्हणजे तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी वॉटर कप स्पर्धेसाठी स्वत: श्रमदान केले आहेच. त्याचबरोबर कामासाठी आर्थिक सहकार्य करणे व ती मिळवून देण्याची जबाबदारीही घेतली. त्यामुळेच आज आंवढी,बागलवाडी, देवनाळ, मायथळ,कुलाळवाडी, बेंळूखी, अशा अनेक गावांत जलसंधारणाचे काम मोठे झालेले आहे. या अधिकाऱ्यांनी हातात टिकाव, खोरे, पाटी घेतली. तसेच त्यांनी उन्हात तळपत दगड उचलण्याचेही काम केले आहे.
जैन संघटनेची मोठी मदत
जैन संघटनेच्या वतीने गेल्यावर्षीपासून वॉटर कप स्पर्धेतील गावांना मोठी मदत होत आहे. या संघटनेने यावर्षी पोकलेन, जेसीबी उपलब्ध करून दिले आहेत. या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम उभे राहिले आहे. या संघटनेमुळे ग्रामस्थांचा उत्साह वाढला आहे. तसेच अनेक संस्था, दानशूर व्यक्तींनीही वॉटर कपच्या कामासाठी मोठी मदत केली.गेल्या 45 दिवसांपसून वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. मंगळवारी या स्पर्धेचा शेवटचा दिवस झाला. राज्यातील अनेक गावांनी स्पर्धेत सहभाग घेऊन परिसर पाणीदार करण्याचा प्रयत्न केला आहे. जत तालुक्यातील चांगलं काम झालं आहे. याचा फायदा भविष्यात निश्चितच होणार आहे.

Rate Card

तहसिलदार अभिजित पाटील यांचे सलग 45 दिवस श्रमदान
जतचे तहसिलदार अभिजित पाटील यांनी वॉटर कप स्पर्धेला सुरूवात झाल्यापासून आपल्या व्यस्क कामातून कुंटुबियासह दररोज एका गावात जात श्रमदान करून नागरिकांना पोत्साहन दिले.त्यातील आंवढी, बागलवाडी गावातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसादामुळे पाटील यांनी स्व:त तर श्रमदान केलेच पंरतू राज्यातील क्रंमाकचे दावेदार बनविण्यासाठी मोठे मार्गदर्शन, सहयोग दिला आहे.प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाटील यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे. पाटील यांच्या दोन वर्षातील कारकीर्दीतून जतला टँकरमुक्त,छावणी मुक्त व दुष्काळी परिस्थिती बदविण्यात प्रशासनातील मोठी भुमिका बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.