संख | दिवसाढवळ्या औषध दुकांनातील 50 हाजार रुपये चोरट्यानीं लांबविले | www.sankettimes.com

0
6

संख,वार्ताहर: गाव भागातील शिवाजी चौक समोरील किरण माने यांच्या मालकीचे औषधाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यानी 50 हाजार रूपयाची रोखड लांबवली.मंगळवारी सकाळी 11 वाजता घटना घडली.
माने यांनी आपले दुकान नेहमीप्रमाणे उघडले.सकाळी 11 च्या सुमारास आपल्या 13 वर्षाच्या मुलास दुकानात बसवून काही कामानिमित्त बाहेर पडले.यांचा फायदा घेत दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.माने यांच्या मुलास बियाण्याचे पाकिटाची मागणी केली.त्याचे पैसेही दिले ते ठेवत असताना डॉव्हर मधील पैशाचे बंडल बघून दौघांनी मुलाला बाजूला ढकलून देत पैशाचे बंडल घेऊन पलायन केले.मुलांने आरडाओरडा केला मात्र तोपर्यत चोरटे पशार झाले.काही नागरिकांनी पाठलाग केला मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.अगदी मध्यवर्ती चौका दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसाचा धाक उरला नसल्याने चोरटे सैराट झाल्याचे आरोप व्यापाऱ्यांनी केले.संख गावात नियमित पोलिस नेमावेत अशी मागणी होत आहे.

चोरी झालेले औषध दुकान

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here