शेगाव | आमदार विलासराव जगताप यांच्या श्रमदानामुळे आंवढीकरांचे बंळ वाढले | www.sankettimes.com

0
2

शेगाव,वार्ताहर : पाणी फाऊडेंशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी आंवढी करानां बुधवारी आमदार विलासराव जगताप यांची साथ भेटली.आमदार जगताप यांची तब्येत साथ देत नसताना सुद्धा तालुक्यातील जलसंधारण वाढले पाहिजे,पाणी टंचाई कायमची संपली पाहिजे,तालुक्यातील जनता,शेतकरी सुखी झाला पाहिजे,यासाठी आमदार जगताप सतत प्रयत्नशील असतात.पाणी फौंडेशनच्या कामासाठी त्यांनी मोठे मार्गदर्शन केले आहे. बुधवारी आंवढीतील हाजारो नागरिकांना स्वत: श्रमदान करून बंळ दिले.अगदी अखेरच्या टप्यात असलेल्या स्पर्धेतील क्रमांक एकसाठी आंवढीकरांनी झोकून देत श्रमदान सुरू केले आहे. दररोज भल्या पहाटे,सायकांळी शेकडो नागरिक श्रमदान करत आहेत. बुधवारी आंवढीकरांनी महाश्रमदान आयोजित केले होते. सुमारे दीड हाजार नागरिक श्रमदान करत होते.त्यात आमदार जगताप यांचा ताफा आला.तब्येतीची तक्रार असतानाही आमदार विलासराव जगताप यांनी पाटी खोऱ्या घेत श्रमदानास सुरूवात केली.त्यामुळे उपस्थित नागरिकांचा उत्साह वाढला.एका दिवसात हाजारो घटफुट काम यामुळे झाले आहे.

नागरिकांही आमदारांच्या उपस्थितीने उत्साहीत झाले आहेत. श्रमदानाचा टप्पा पुर्ण करून प्रथम क्रंमाकाचे बक्षिस तर घेणारचं,त्याचबरोबर जलसंधारणच्या या कामामुळे पाणी टंचाई संपवू असे यावेळी संरपच आण्णासाहेब कोडक यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ नेते लक्ष्मण बोराडे,प्रमोद सांवत,माणिक पाटील,लक्ष्मण कोडक,उपसंरपच प्रदिप कोडक आदी मान्यवर उपस्थित होते.

आंवढी ता.जत येथील पाणी फौंडेशनच्या कामात आमदार विलासराव जगताप यांनी श्रमदान करून नागरिकांना बंळ दिले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here