माडग्याळ | ग्रामसभा पोलिस बंदोबस्तात व इन कॅमेरा व्हावी | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी:माडग्याळ ता.जत येथील ग्रामसभा पोलिस बंदोबस्त व इन कॅमेरा व्हावी अशी मागणी शिवानंद हाक्के व अन्य पाच सदस्यांनी ग्रामसेवकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,ग्रामसभा वेळेवर होणे गरजेचे आहे.तसेच ग्रामसभेत काही ग्रामस्थ हुलडबाजी करतात.काही वेळा सदस्यांना धमकावण्याचे प्रकार घडतात.त्यामुळे महिला सदस्य व नागरिकांचा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ग्रामसभेत काहीजण टोळक्याने गोंधळ घालतात.एकद्या महत्वाच्या विषयावर बोलू दिले जात नाही.अरेरावेची भाषा वापरणे,विषय गोंधळ घालून गुंडाळलयाला लावणे असे प्रकार घडतात.अनेकवेळा महिला सदस्यांना आर्वच्य भाषा वापरली जात आहे.त्यामुळे यापुढे खुल्या वातावरणात ग्रामसभा होण्यासाठी पोलिस बंदोबस्त व इन कॅमेरा व्हावी अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनांवर आप्पा घाटगे, साधना सांवत,गोदाबाई जाधव, दत्तात्रय निकम यांच्या सह्या आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.