जत | शेतजमिनीच्या कारणावरून चप्पल, लाथा बुक्यांनी मारहाण | www.sankettimes.com

0
9

जत,प्रतिनिधी: अंकले ता.जत येथील रमेश आंनदा शिंगाडे यांच्या घरातील 9400रू गावातील विकास महादेव दुधाळ यांनी 29 एप्रिलला चोरून नेहले होते.गावात हे प्रकरण मिटवित संपुर्ण पैसे परत देण्याचे ठरल्या नंतर फक्त 3 हाजार नऊशे रूपयेच परत दिले बाकी पैसे विकासने न दिल्याने रमेश यांनी चोरीची जत पोलिसात फिर्यादी दिली आहे.

जत,प्रतिनिधी: येथील ऑयनॉक्स कंपनीच्या पवनचक्की एमव्हीटी 83 हिचा 30 एप्रिलला सकाळी साडेदहा पुर्वी दरवाज्याचे कुलूप तोडून आतिल 18 हाजार रुपयाची केबल अज्ञात चोरट्यानी चोरून नेहल्याची फिर्याद सिक्युरिटी ऑफिसर संजीव श्रीराम शेबेकर यांनी जत पोलिसात सोमवारी दिली.

जत,प्रतिनिधी: गुगवाड ता.जत येथील लक्ष्मी बसाप्पा अंदानी (वय-32)व दिर नागाप्पा शिवाप्पा अंदानी, रा.गुगवाड यांना शेतजमिनीच्या कारणावरून रविवारी दुपारी तीन वाजता शेतात चप्पल, लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद जत पोलिसात दाखल झाली आहे.
फिर्यादीत बाबन्ना चौगुले,पिराप्पा चौगुले, दानाप्पा चौगुले, बसाप्पा चौगुले, दुडाप्पा चौगुले, विठ्ठल चौगुले सहा मिळून फिर्यादी लक्ष्मी, दिरा नागाप्पा यांनै चप्पल,लाढ्याबुक्यानी मारहाण केली,यात लक्ष्मीच्या डाव्याहातच्या मनगटावर खोऱ्याच्या तुब्याने मारून जखमी केले आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास बी.एस.कोळी करत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणास अटक नाही.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here