डफळापूर | संस्थापक सटवाजीराव डफळे यांची डफळापूरमध्ये आढळली समाधी | www.sankettimes.com

0

शिवकालातील लढवय्ये सरदार

डफळापूर, वार्ताहर :

शिवकालीन प्रसिद्ध सरदार आणि जत जहागिरीचे मूळ संपादक सटवाजीराव डफळे यांची डफळापूर येथील समाधी उजेडात आली आहे. उमराणीचे जहागीरदार अमरसिंहराजे डफळे यांच्या प्रयत्नातून आणि इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्या अभ्यासातून या शूर योद्धयाच्या स्मृती स्थळाला उजाळा मिळाला आहे. या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे.गुप्त भुयाराने डफळापूर राजवाडा व अंनतपूर येथील भुईकोट किल्याशी जोडलेली समाधी इतिहासाकारांनी समोर आणली आहे.डफळापूर गावच्या बेंळूखी रोड नजिक ही समाधी आहे.प्रथम पासून डफळापूरांना औसुक्याचा विषय बनलेले चौक बांधकाम बाजूलाच समाधी खाली जाण्यासाठी भुयारी मार्ग व त्यांच्या बाजूला तुळशीवृंध्दावन होते.त्यामुळे ही समाधी कायम जुन्या इतिहासाशी काहीतरी संदर्भ असण्याची शक्यता बऱ्याच जुन्या लोकाच्या खाजगीत बोलण्यातून समोर यायचं.पंरतू नेमकी माहिती नसल्याने बऱ्याच दिवसापासून त्यांचे औसुक्य कायंम होते.ते डफळे,गायकवाड, व इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकर यांनी समोर आणले आहे.समाधीच्या खाली जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे.त्याशिवाय समाधी खाली शिवलिंग असल्याचेही डफळे घराण्याचे आप्त असलेले सुभाषराव गायकवाड यांनी सांगितले.

    शिवकालीन प्रसिद्ध योध्दे सटवाजीराव डफळे यांची समाधी डफळापूर येथील सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात असल्याची माहिती उमराणीचे जहागीरदार अमरसिंह डफळे यांना मिळाली होती. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन माहिती घेतली. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी या समाधीस्थळाचा अभ्यास केला. त्यांची बांधकाम शैली आणि भव्यता पाहून ही प्रसिद्ध पुरूषाचीच समाधी असल्याचा निर्वाळा दिला. घराण्यातील अन्य व्यक्तिचा अभ्यास केला असता ही समाधी सटवाजीराव डफळे यांचीच असल्याची खात्री झाली.

Rate Card

डफळापूर गावात प्रवेश करताना सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात ही समाधी आहे. गायकवाड घराणे हे डफळे घराण्याचे नजीकचे आप्त असल्याने त्यांनी आजवर या समाधीचे जतन करून ठेवले होते. या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची कल्पना डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी मांडली. त्यानुसार एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाधीभोवती असणारी झाडे झुडपे काढण्यात आली. आणि परिसर स्वच्छ करण्यात आला.  यावेळी अमरसिंह डफळे, सुभाषराव गायकवाड, रमेश गायकवाड, सुरेशराव डफळे, विक्रमसिंह डफळे, बाळासाहेब  गायकवाड, धैर्यशीलराव डफळे, संग्रामसिंह डफळे, राहूल डफळे, खर्डेकर सरकार, अमरसिंह इंगोले, बाप्पासाहेब डफळे, जयवंतराव डफळे, मोहनराव गायकवाड, रमेश शिंदे, वसंतराव चव्हाण, परशुराम चव्हाण यांच्या सह डफळापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. गायकवाड कुटुंबियांनी ही समाधी जतन करून ठेवल्या बद्दल अमरसिंह डफळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

   सटवोजीराव डफळे हे पराक्रमी योध्दे होते. अदिलशहाने त्यांना जत, करजगी, होनवाड, बारडोल या चार गावांचे देशमुखी वतन दिले होते. त्या काळातील अनेक लढायात त्यांनी पराक्रम गाजवला. पुढे मोगल काळातही त्यांना नवी वतने मिळाली. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ही त्यांनी काही लढायांत मर्दुमकी गाजवली. सन 1706  मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची समाधी त्यांचे वास्तव्याचे ठिकाण असलेल्या डफळापूर गावी बांधण्यात आली. सध्या ही समाधी डफळे यांचे आप्त असणाऱ्या गायकवाड यांच्या शेतात आहे. या पराक्रमी योद्धयाच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे.

समाधी स्थळाचे शुशोभिकरण होणार

समाधी डफळे संस्थाचे संस्थापक यांचा पराक्रम इतिहासात अजमाअमर आहे.त्यांचे ऐतिहासिक समाधी स्थंळ समोर आल्याने त्यांच्या कार्याला यामुळे उजाळा मिळणार आहे.त्यांच बरोबर समाधी स्थळाचे शुशोभिकरण केले जाणार आहे. या समाधी स्थळामुळे डफळापूर पुन्हा इतिहास संशोधकांना आकर्षित करणार आहे. संस्थापक सटवाजीराव डफळे यांचे डफळापूर येथील समाधी उजेडात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.