संख,वार्ताहर : येथील संख ग्रा.बिगर शेती सह पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सर्व धर्मिय सामुहिक विवाह सोहळ्यात 9 वधु-वरांचा विवाह संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जंयतराव पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी मुरगेद्र महास्वामीजी,अमृत्तानंद महास्वामीजी,आ.विलासराव जगताप,कॉग्रेस नेते विक्रसिंह सांवत,भाजप नेते रविंद्र आरळी,माजी सभापती आर.के.पाटील,सभापती तम्माणगोंडा रवीपाटील,सौ.मंगल जमदाडे,दयगोंडा बिराजदार,ह.भ.प.तुकाराम महाराज,जि.प.सदस्या रेखा बागेळी,रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आदी मान्यवर उपस्थित होते.
जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर सामान्य शेतकरी,कष्ठकरी,व सामान्य नागरिकांच्या पाल्याचे विवाह अडू नयेत.यासाठी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यात वधु-वरांना पोषाक,दागिणे,व संसार साहित्य मोफत देण्यात आले. त्याशिवाय वधु-वरांच्या नातेवाईकांच्या जेवनाची सोय करण्यात आली होती.भरगच्च भरसेल्या मंडपात हा विवाह सोहळा संपन्न झाला.यावेळी बालगाव येथील अमृतानंद महास्वामीजी यांच्या कडून रोख 11 हाजार,तर गोधळेंवाडी येथील तुकाराम महाराज यांच्या कडून इलेक्ट्रिक शेगडी व कुकर नव दापंत्याना भेट दिली.
संख येथे सामुहिक विवाह सोहळ्यात 9 वधु-वरांचा विवाह संपन्न झाला.





