डफळापूर | आ.जंयत पाटील यांचा असाही साधेपणा |

0

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर माजी मंत्री, आमदार जयंत पाटील रविवारी पहिल्यांदाच जत तालुका दाैऱ्यावर आले. प्रांरभी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या डफळापूर येथे त्यांचा अगदी घरगुती पध्दतीने सत्कार करण्यात आला.  आ. पाटील यांची विद्वता, वक्तृत्व, राजकीय प्रगल्भता याचे अनेक किस्से आपण एेकले असतील पण डफळापूरकरांनी आज त्यांच्यातील साधेपणा अनुभवला.

जत पश्चिम भागाचे बाहुबली नेते माजी सभापती मन्सूर खतीब याच्याहस्ते आ जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर  आमदार पाटील खतीब याच्या कार्यालयात गेले. तेथे कुठलाही डामडाैल न पाहता थेट जनतेसाठी ठेवलेल्या एका फायबरच्या साध्या खुर्चीत विराजमान झाले. अगदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे लगतच्या हॉटेलमधील कोरा चहा घेतला. त्यांचे वडील व महान पदयात्री नेते राजाराम बापू यांची झलक आज त्यांच्यात पहावयास मिळाली.  प्रदेशाध्यक्षपद असो की मंत्रीपद आपली सामान्य जनतेशी जोडलेली नाळ पक्की आहे,  हे आज त्यांनी दाखवून दिले.कोणत्याही डामडाैल,  बडदास्त याची अपेक्षा न करता सामान्य कार्यकर्त्याबरोबर बसणारे आपले नेते, ही बिरूदावली त्यांनी आजही कायम ठेवली. जनतेचा नेता म्हणून प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील राज्याला निश्चतच प्रगतीच्या शिखरावर घेऊन जातील,असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.

Rate Card

डफळापूर: जत दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जंयतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन हुसेन आत्तार,जेष्ठ नेते बी.आर.पाटील, माजी उपसंरपच शंकरराव गायकवाड, युवक नेते सज्जनराव चव्हाण, सतिश भोसले, भानूदास गडदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.