उमदी | अप्पर तहसील कार्यालय कामकाजास सुरुवात |

0
2

जत,का.प्रतिनिधी:उमदी (ता-जत) शासन आदेशानंतरही अनेक दिवस प्रलंबित असलेले अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज मंगळवार पासून प्रत्यक्षात सुरु झाले आहेे. अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड यांनी उमदी परिसरातील नागरिकांची कामे करत कामास सुरूवात केली.

उमदी येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे यामागणीसाठी उमदी जनकल्लोळ उठला होता.मोठ्या प्रमाणात अंदोलने झाले.परिणामी दोन वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील बहिष्कारामुळे शासनाने गंभीर दखल घेत संख अप्पर तहसिल कार्यालयाचे कामकाज दोन दिवस उमदीत सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.

महसूसमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार संजय पाटील यांनी प्रयत्न केले,दरम्यान आदेशानंतरही रेंगाळलेले कार्यालयाचे कामकाज मंगळवार ता.8 पासून उमदी ग्रामसचिवालयातील एका खोलीतून सुरू झाले आहे.तेथे सर्व कक्ष,संगणक व्यवस्था केली आहे.उमदी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरु झाल्याने आनंद व्यक्त होत आहे उमदीसह परिसरातील हळ्ळी बालगांव बोर्गी निगडी बु उटगी सोनलगी सुसलाद आकळवाडी बेळोडगी आदी गावातील नागरिकांना यामुळे सोय होणार आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नाप्पा होर्तीकर,सुरेश कुळोळी,निसार मुल्ला,मुत्तु तेली आदिसह सर्व पक्षाचे पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक सुनील पोतदार यांनी केले तर सुत्रसंचालन राहुल संकपाळ यांनी मानले.

चौकट

उमदीकरांना दिलासा …

प्रथमपासून उमदीला तालुका, अप्पर तहसिल करण्याची मागणी होती.ते होणार हेही निश्चित होते.मात्र ऐनवेळी संखचे नाव पुढे आल्याने व ते कार्यालय सुरू झाले. त्यामुळे आम्हाला संघर्ष करावा लागला.यांची शासनाने दखल घेत दोऩ दिवसासाठी अप्पर तहसिल कार्यालयाचे कामकाज उमदीतून सुरू केल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे. यापुढेही तालुका होण्यासाठी आमचा संघर्ष कायम राहिल.

अॅड.चन्नाप्पा होर्तिकर,माजी जिल्हा परिषद सदस्य

उमदी ता.जत येथील अप्पर तहसिल कार्यालयाचे कामकाज सुरू झाले. पहिला दाखला अॅड.चन्नाप्पा होर्तिकर यांना देताना तहसिलदार नागेश गायकवाड

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here