जत | ग्रामपंचायत निवडणूक : थेट संरपच 14,सदस्यसाठी 38 अर्ज दाखल | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी:जत तालुक्यात होत असलेल्या 6 ग्रामपंचायती,व पाच गावातील पोट निवडणूकीसाठी शुक्रवार पर्यत थेट संरपच पदासाठी 14,तर सदस्य पदासाठी 38 अर्ज दाखल झाले.तालुक्यातील बिंळूर,खिलारवाडी,गुजगुजनाळ,उमदी,कोणबगी व कोतेबोबलाद  ग्रामपंचायतीं व कुलाळवाडी, एकुंडी, अमृतवाडी, धुळकरवाडी, अंकलगी या गावांत प्रत्येकी एका जागेकरिता पोटनिवडणूक होत आहे. यातिल कोतेबोबलाद, उमदी,बिंळूर या गावात सर्वाधिक चुरसीची निवडणूक होणार आहे. उमदी,बिंळूर, खिलारवाडी येथे गतवेळी निवडणूकीत बहिष्कार टाकला होता.तेथेही निवडणूक होत आहे.आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतिल.गावातील थेट संरपच पदासह पँनेलसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.राखीव जागासाठी जातीचे दाखले नसल्याने पँनेल प्रमुखांची मोठी अडचण होत आहे. सक्षम उमेदवार शोधताना त्यातच जातीचे दाखले महत्वपुर्ण असल्याने मोठ्या कसरती पाह्याला मिळत आहेत.काही पँनेलला जातीच्या दाखल्या अभावी जागा गमविण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय दृष्टा सस्पेश असणाऱ्या
कोंतेवबोबलाद ग्रामपंचायतीची निवडणूक या सिजनमध्ये होत आहे. प्रांरभीच राजकीय वादाने गाव ढवळून निघाले आहे.दरम्यान उमदी ग्रामपंचायतीत ही मोठी चुरस पाह्याला मिळत आहे.उमदीत कॉग्रेसकडून जेष्ठ नेते निवृत्ती शिंदे यांच्या पत्नी रिंगणात उतरणार असल्याने विरोधी गटापुढे आवाहन उभे टाकले आहे.दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेस, व भाजप एकत्र येण्याची शक्यता आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.