निगडी खुर्द | अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक एक ठार |

0
2

निगडी खुर्द,वार्ताहर: येथील निगडी खुर्द-जत मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक दिल्याने दुचास्वार दादासाहेब महबूब शेख(वय-30,रा.निगडी खुर्द) हा जागीच ठार झाला.संध्याकाळी 9 च्या सुमारास घटना घडली.
अधिक माहिती अशी, संध्याकाळी 9 च्या सुमारास दादासाहेब शेख गावातून घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी धडक दिल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्ञाव झाल्याने जागीच मुत्यू झाला.धडक दिलेले वाहन भरधाव गतीने निघून गेले.याबाबत अज्ञात वाहन व चालकांवर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान दादासाहेब यांच्या पश्चात आई,वडिल,पत्नी,मुलगा असा परिवार आहे.घरातील कर्ता पुरूषाचा अपघाती मुत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here