बनाळी | …अखेर बनाळी शिवारात म्हैशाळचे पाणी दाखल |
..
बनाळी,वार्ताहर: म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी अखेर बनाळीच्या शिवारात दाखल झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
बनाळीचे विद्यमान सरपंच सौ.विद्याताई सावंत, दत्तापंत सावंत, शेगांवचे माजी उपसरपंच शहाजीबापू बोराडे ,दत्ता निकमसर,बी.आर.सावंतसर,दाजीराम जाधव आबासाहेब सावंत यांनी पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले.आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना माजी कृषी सभापती संजीवकुमार सावंत यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी बनाळी शिवारात पोहोचण्यासाठी मोलाचे योगदान दिले होते.तसेच मोर्चा,आंदोलने, निवेदने,आमरण उपोषण अशा विविध मार्गाने शासनावर दबाव आणून आपला कार्यकाळ व कृषी सभापती पदाची प्रतिष्ठा पणाला लावली होती.त्यांच्या कार्याची आठवण बनाळी परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच होत आहे.

कोणतेही पद नसताना पाण्यासाठी धडपड तसेंच म्हैसाळ योजनेच्या अधिग्रहित जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सध्या त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
बनाळी परिसरात सध्याच्या परिस्थितीत उन्हाळ्याची तीव्रता वाढत असुन पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. विहीरी कोरड्या पडू लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आहे. त्यामुळे उशिरा का होईना पण पाणी पोहोचल्याने बनाळी परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
म्हैसाळ योजनेच्या पाणी बनाळी शिवारात बुधवारी दाखल झाले.