शिवदर्शनचा ‘लगी तो छगी’ एक रहस्यमय चित्रकृती “””

0
3

काही दिग्दर्शकांचा एका विशिष्ट पद्धतीचे सिनेमा बनविण्यात हातखंडा असतोत्यामुळेच अशा दिग्दर्शकांच्या चित्रपटांची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहात असतात. ‘कॅनव्हास’ यासिनेमाद्वारे दिग्दर्शनाकडे वळल्यानंतर पदार्पणातच कौतुकास पात्र ठरलेला दिग्दर्शक शिवदर्शन म्हणजेच शिबू साबळे  आता  ‘लगी तो छगी’ हा कॉमेडीसस्पेन्सथ्रीलरपठडीत मोडणारा सिनेमाघेऊन आला आहे.शिवदर्शन साबळे यांनी दिप्ती विचारेस्वाती फडतरे आणि अजित पाटील यांच्या साथीने ‘लगी तो छगी’ या आगामी मराठी सिनेमाची निर्मिती केली आहेपद्मश्री शाहिर साबळे यांचीपरंपरा सुरू ठेवणा-या शिवदर्शनचा हा तिसरा मराठी सिनेमा आहेसाबळे कुटुंबियांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ पासून आतापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना मोहिनी घालणारा आहेत्यामुळेच हा सिनेमाप्रेक्षकांसाठी संगीतमय पर्वणीच ठरणार आहेशाहिर साबळेचे चिरंजीव आणि शिबूचे वडील देवदत्त साबळे  यांनी संगीतकार अनुराग गोडबोलेंच्या साथीने या सिनेमासाठी संगीत दिलं आहे. “हीचाल तुरू तुरू…” या गाण्याने अखंड महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या  देवदत्त साबळे यांनी 40 वर्षांपूर्वा लिहिलेलं तसंच संगीतबद्ध केलेलं एक गीत या सिनेमात ऐकायला मिळणार आहेशिवदर्शनने बंधूहेमराजच्या साथीने या चित्रपटाचं लेखन केलं आहे.

या सिनेमाची कथा अडचणीत सापडलेल्या आजच्या युगातील एका तरूणाभोवती गुंफण्यात आली आहेअभिनेता अभिजीत साटमने ही भूमिका साकारली आहेशिबूला कायम वेगळयावाटेने जाणाऱ्या  पटकथांनी आकर्षित केलं आहेसिनेमाच्या माध्यमातून केवळ  मनोरंजन  करता कायम त्याद्वारे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. ‘लगी तो छगी’ हा सिनेमासुद्धात्याच प्रकारचा असल्याचं सांगत शिबू म्हणाला कीहा कॉमेडीसस्पेन्सथ्रीलर आहेथ्रील हे सिनेमाचं अविभाज्य अंग आहेसिनेमा कोणत्याही प्रकारचा असला तरी पटकथेत थ्रील असणंगरजेचं असतंया सिनेमाची कथा तशाच प्रकारची असल्याने रसिकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल असंही शिबू मानतो.

या सिनेमात अभिजीत सोबत निकीता गिरीधररविंदर सिंग बक्षीमिलिंद उकेयोगेश सोमणअसित रेडीज,शैला काणेकरराजू बावडेकरसागर आठलेकरमहेश सुभेदारअक्षय भोसले आणिसुरेंदर पाल आदी कलाकारांच्याही भूमिका आहेतदेवदत्त यांच्या एका गीतासोबतच मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या एका अनोख्या ढंगातील गीताचा समावेशही या सिनेमात करण्यात आला आहे.राष्ट्रीय पारितोषिक विजेते कॉस्च्युम डिझाइनर सचिन लोव्हलेकर यांनी कॉस्च्युम डिझायनिंगची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून संकलनाचं काम अपूर्वा मोतीवालेसहाय आणि आशिषम्हात्रे यांनी पाहिलं आहेशीर्षकापासूनच उत्कंठा वाढविणारा हा सिनेमा पडद्यावरही तितकाच सुरेख दिसावा यासाठी कॅमेरामन प्रदिप खानविलकर यांनी खूप मेहनत घेऊन वेगवेगळयाअँगलमधून या सिनेमाचं छायांकन केलं आहेगोवापुणे तसेच मुंबईतील विविध लोकेशन्सवर या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.   

दीनानाथ  घारपुरे  [ मनोरंजन  प्रतिनिधी ]  ९९३०११२९९७  

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here