कागनरी | बेकायदा दारू अड्ड्यावर छापा,26 हाजाराचा मुद्देमाल जप्त |
जत,प्रतिनिधी: कागनरी ता.जत येथे बेकायदा दारू विकणाऱ्या अड्ड्यावर उमदी पोलिसांनी छापा टाकत संशियत आरोपीसह 26 हाजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.उमदी पोलीस ठाणे हद्दीत संख दुरक्षेतमध्ये कागनरी या गावच्या हद्दीत कागनरी ते टाकळकी जाणारे रोडच्या पश्चिमेस कागनरी गावापासून 1 किमी अंतरावर लमाण वस्ती येथे हा छापा टाकला. सशयिंत रामशिंग हरिबा राठोड(वय-55 वर्षे,रा- कागनरी) हा बेकायदा बिगर परवाना देशी दारूची विक्री करत असल्याची बातमी मिळाल्याने सहा.पोलीस निरीक्षक भगवान शिंदे,प्रविण संपागे पो.का.वळसंग, करांड,आटपाडकर,चालक पाटील यांनी रंगेहाथ पकडले.
सशयिंत आरोपीच्या राहते घराच्या बाजूस असलेल्या ऊसाच्या पाला पाचोळ्या मध्ये देशी संत्रा आयकॉप कंपनीच्या 5 बॉक्स व टंगो पंच कंपनीच्या 6 बॉक्स असा एकूण 11 बॉक्स प्रति बॉक्समध्ये 48 बाटली असे एकूण 528 सीलबंद बाटल्या प्रति बाटली 50 रू दराने अशी एकूण किंमत 26 हाजार 400 रु किमतीचा प्रॉव्हि माल मिळून आला तो ताब्यात घेण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस उपनिरीक्षक कोळी हे करीत आहे.
कागनरी ता.जत येथे बेकायदा दारू अड्ड्यावर उमदी पोलिसांनी छापा टाकून संशियत आरोपीसह मुद्देमाल जप्त केला
