डफळापूर | बेंळूखीत तुफान आलायं पाणी फाऊडेंशच्या या हंगामातील वॉटर कॅॅपसाठी ग्रामस्थ सरसावले
: दररोज दोनशेवर उपस्थिती
डफळापूर,वार्ताहर : बेंळूखी ता. जत येथील पाणी फाऊडेंशच्या या हंगामातील वॉटर कॅॅपसाठी ग्रामस्थ सरसावले असून दररोज दोनशेवर ग्रामस्थाची उपस्थिती यंदाचा वॉटर कॅॅप बेंळूखीला मिळणार या उद्देशाने बेंळखीकर झपाटून कामाला लागले आहेत.
खरचं जलसंधाराचे किंबहूना पाणी फाऊडेंशचे महत्व पटल्याने ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती राहत असून यावर्षीची वॉटर कॅॅप मिळवणारच म्हणून बेंळूखीत “तुफान आलायं”
अमिर खानच्या पानी फौंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणची कामे हाती घेत जत तालुक्यातील बेंळूखीत दररोज पहाचेपासून तीन-चार तास शेकडो ग्रामस्थाच्या उपस्थितीत श्रमदान करण्यात येत आहे. सततच्या पानी टंचाईच्या पाश्वभूमीवर जलसंधाराचे महत्व पटल्याने गावातील लहानापासून थोरापर्यत दररोज शेकडो ग्रामस्थानी पुढाकार घेतला आहे.
पानी फौंडेशनच्या वतीने 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान वॉटर कप स्पर्धा होणार आहे.बेंळूखीतील ग्रामस्थांनी 8 एप्रिल पासूनच गावात कामाला सुरुवात केली आहे. दररोज सकाळी पहाचेपासून ते नऊ दरम्यान श्रमदान करण्याचे ठरले आहे. त्यानुसार सलग उत्स्फूर्तपणे वॉटर कपसाठी दररोज श्रमदान सुरू असून पहिला अल्प प्रतिसादाने सुरू झालेल्या कामात अाता ग्रामस्थाचा मोठा सहभाग लाभत असून मंगळवाराची दोनशेवर ग्रामस्थाची उपस्थिती अधिकाऱ्याना हि मोठे कौतुकास्पद वाटली असून बेंळूखी वॉटर कॅॅप चा हक्कदार बनला असून असाच सहभाग वाढल्यास या हंगामातील वॉटर कॅॅप बेंळूखीला मिळेल असा विश्वास मंगळवारी उपस्थित असलेले गटविकास अधिकारी मिंलिद टोणफे यांनी व्यक्त केला.
स्थानिक पातळीवर पावसाचेपाणी वाचवणे हाच जलसुरक्षेचा खात्रीशीर मार्ग आहे. शेतकरी, प्रतिष्ठित, लहान-मोठा प्रत्येक नागरिक या चळवळीचा एक भाग झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात ही भावना रुजली पाहिजे. या कामात माझी एक महत्वाची भूमिका असणार आहे. ती मी सहज आणि हसत खेळत पार पाडू शकणार आहे अशी प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात भावना तयार झाली पाहिजे. पानी फौंडेशनची हीच संकल्पना आम्हाला पटली आहे. गावातील कामे श्रमदानातून होऊ शकतात. आम्ही दररोज तीन तास गावात काम करणार आहोत असे बेंळूखीतील ग्रामस्थानी सांगितले. कामासाठी कृषी सहाय्यक पांडूरंग शिंदे, पाणी फाऊडेंशचे तालुका अधिकारी श्रीं.सुंर्यवंशी साहेब,सुरेखा मँडम हे नियोजन करण्याबरोबरच स्वत: श्रमदान करत असल्याचे प्रोत्साहन देत आहेत.पानी
फाउंडेशनच्या स्पर्धेसाठी जत तालुक्यातील अनेक गावात मोठय़ा प्रमाणावर कामे सुरू झाली आहेत. बेंळूखीत पहिल्या टप्प्यामध्ये समतल चर काढण्यात येत आहे. शाळकरी मुले, तरूण, महिलांसह ज्येष्ठांनीही कामामध्ये सहभाग नोंदविल्यामुळे जलसंधारण ही चळवळ बनली आहे. लोकांचा कामात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.पहिल्या टप्यात समतल चरीचे काम सुरू असून यापुढे अनघळ दगडी बांध,विहिर पुर्नभ्रमण ,माती प्रशिक्षण, मलचिंग ,ड्रीप ,शेततळी, ओढा,बंधाऱ्यातील गाळ काढणे , वृक्ष लागवड आदि कामे होणार असून बेंळूखी वॉटर कॅॅप मिळवणारच असा विश्वास कृषी अधिकारी पांडूरंग शिंदे यांनी सांगितले .
डफळापूर : बेंळूखीत पाणी फाऊडेंशचे चालू असलेले काम