पावती शिवाय,व चिल्लर नसल़्याच्या कारणाने लुट;वाहतुकीचा खर्च जास्त : नागरिकांची सुयोग्य अंमलबजावणीची मागणी
जत,(प्रतिनिधी): जत सह बिंळूर,संख व उमदी येथे गॅस ग्राहकाकडून प्रति सिलेंडर मुळ किंमत व पावती शिवाय जादा पैसे घेतले जात असल्याने ही ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी गॅसधारकांनी केली आहे.
जत तालुक्यातील शासनाच्या कंपन्याकडून गँस वितरण केले जाते.प्रत्येक पंचायत समिती गटातील मोठ्या गावात आठवड्यातून एक किंवा गरजेनुसार दोन दिवस गॅस एजन्सीद्वारे गॅस ग्राहकांना सिलिंडर पुरवठा केला जातो. शासनाच्या नियमाप्रमाणे व वाहतूक भाडे पावती नोंद असते.पंरतू या गँस एजन्सी प्रत्येक सिलिंडर मागे पावती शिंवाय तीस ते चाळीस रुपये जादा घेतले जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आधीच केंद्र शासनाने सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्याने सामान्य लोकांचे बजेट कोलमडले आहे. गरीबाला उज्वल योजनेत कनेक्शन मिळते. पण सिलिंडर खरेदी करताना दाद पैसे कोठून आणावे, असा प्रश्न पडला आहे.मुळ किंमतीचे सिलिंडर पावतीतील रक्तमेपेक्षा जादा पैसे घेतले जात आहेत.अनेक गावात देखिल ग्राहकांना सिलिंडर घरपोच मिळत नाही. सिलेंडरसाठी मेनरोडवर किंवा गावातील रस्त्यावर खाली सिलेंडर घेवून उभे राहावे लागते. ग्राहकांना रूपयाची पावती मिळते आणि उर्वरित पैसे वाहतुकीचा खर्च म्हणून घेतला जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.पंरतू मुळ पावतीत वाहतूक खर्च लावलेला असूनही जादा पैसे घेतातच कसे? व शासनाचा सक्षम विभागाचे अधिकारी काय काम करतात असा सप्तंत सवाल ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. काही ग्राहकांना चिल्लर नसल़्याचे कारण देत उर्वरित पैसे परत केले जात नाहीत.तोहि जादा भुंर्दड ग्राहकांवर पडत आहे. तसेच गॅस एजन्सीचेयेणारे कर्मचारी ग्राहकांना अरेरावी पद्धतीने वागतात त्यावर संबधित विभागाकडून कारवाई करावी,व ग्राहकांची होत असलेली लुट थांबविण्यात यावे, अशी मागणी गॅस ग्राहकांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या गरिबांना मोफत
गँस योजनेतून ही जत तालुक्यातील गँस एजन्सी कडून लूट सुरू असून कनेक्शन मागे पाचशे ते हाजार रुपयाचे जादा पैसे पावती न देताच गँस एजन्सी ग्राहकांकडून लुटत आहेत.देशाचे पंतप्रधानाच्या लोकानुभूक योजनेची ह्या गँस एजन्सी वाट लावत असून तालुकास्तरीय पुरवठा अधिकाऱ्याकडून याला अर्थपुर्ण सहयोगाने असण्याची शक्यता नाकारता येत नाही.