गुड्डापूर | सामुदायिक विवाह सोहळ्यात 21 वधू-वरांचा थाटात विवाह सोहळा | www.sankettimes.com

0

माडग्याळ,वार्ताहर : सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर…, पावण्या-रावळ्यांची लगीनघाई…पुष्प पाकळ्यांच्या अक्षतांचा सुगंधी वर्षाव…, ना फटाक्यांचा आवाज…, ना डॉल्बीचा दणदणाट…, अशा मंगलमय वातावरणात रविवारी श्रीक्षेत्र गुड्डापूरात पर्यावरणपूरक व सामाजिक बांधीलकी जोपासणारा सामुदायिक विवाह सोहळा झाला. श्रीखंड-पुरी भोजनाच्या पंगतीने हा सोहळा गोड झाला.

Rate Card

धर्मादाय आयुक्त कार्यालय व सामुदायिक विवाह समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माच्या 21 जोडप्यांचा सामुदायिक विवाह संपन्न झाला. यावेळी धर्मादाय उपाआयुक्त महावीर जोगी, सा.आयुक्त राजेंद्र परदेशी,आर.आर.पाटील,सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध डॉ.रविंद्र आरळी,शिक्षण सभापती तम्मानगौंडा रवीपाटील,पंचायत समिती सदस्य अॅड.आडव्याप्पा घेरडे,धानम्मादेवीची ट्रस्टचे पदाधिकारी,मनोहर सारडा,समितीचे सचिव सतिश भोसले,संरपच अशोक पुजारी आदी प्रमुख उपस्थित होते.विवाह सोहळ्यासाठी भव्य मंडप, वधू-वरांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारण्यात आले होते. सकाळी 11 वाजून 54 मिनिटांच्या मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न झाला. अशा मंगलमय वातावरणात विविध धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. सकाळी 9 वाजता वधू-वरांचे उत्साही वातावरणात स्वागत करून नाष्टा देण्यात आला. त्यानंतर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. सकाळी वरांना समितीच्या वतीने संसारसेट देण्यात आला. अवास्तव खर्च वाचेल :अशा विवाह सोहळ्यांमुळे एैपत नसतानाही मुलीचे लग्न कर्ज काढून थाटामाठात करण्याच्या प्रथेला बगल मिळेल, तसेच लग्न समारंभासाठी होणारा अवास्तव खर्च वाचेल, यामुळे यापुढील काळात अशा प्रकारचे सामुदायीक विवाह सोहळे व्हावेत यासाठी या समितीच्या वतीने आवश्यक ती मदत केली जाईल, असा विश्वास डॉ.रविंद्र आरळी यांनी व्यक्त केला.वधू-वरांना 11 हाजार रूपयाची मणीमंगळसुत्र व दागिणे,15 हाजार रूपयाचे कपडे,21 हाजार रुपयाचे संसार साहित्य देण्यात आले.

 गुड्डापूर मधील सामुदायिक विवाह सोहळ्यात 21 वधू-वरांचा थाटात विवाह सोहळा संपन्न झाला

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.