शेगाव | तलावात म्हैशाळचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी:शेगाव(ता.जत)येथील  साठवण तलाव क्रमांक दोन मध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यासाठी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी पट्टी एक महीन्यापूर्वी भरूनही पाणी न सोडल्याने तेथील शेतकऱ्यांनी पाणी सोडावे या मागणीसाठी जत तहसिल कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.उपोषणचा आज दुसरा दिवस आहे.

 पाणीपट्टीचे 1 लाख 54 हजार रुपयांची पाणी पट्टी भरली आहे.सध्या तिव्र उन्हाने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उभी पिके  हातची जाण्याची स्थिती आहे. म्हणून तलावात तातडीने पाणी सोडण्याची अनेकवेळा विनंती करूनही अद्यापही पाणी दिले नाही.त्यामुळे संबधित विभागांच्या निषेधार्थ शेगाव येथील शेतकऱ्यांनी जत तहसिल कार्यालयासमोर शुक्रवार दि.4 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आमदार विलासराव जगताप,अॅड. प्रभाकर जाधव,गुळवंचीचे सरपंच पी.के.खटके यांनी पाठींबा दिला.यावेळी दत्ता निकम, शहाजी गायकवाड, शहाजी बोराडे, माणिक बोराडे, राम नाईक,ज्ञानदेव निकम, शामराव  शिंदें, उमेश गायकवाड,अशोक गायकवाड, निवृत्ती बोराडे, पप्पु निकम, विजय माने, अशोक गायकवाड, सोपान निकम ,आदी उपोषणकर्ते शेतकरी आमरण उपोषणास  बसले  आहेत.                    म्हैसाळ योजनेचे पाणी  शेतकऱ्यांना मिळण्यासाठी  एक महीना पैसे भरले आहेत,विभागाची बैठक होऊन एक महिना उलटला तरीही योजनेचे पाणी मिळत नाही.वेळोवेळी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी तलावात देण्याची विनंती केली.त्यांनी पाणी आज देऊ,उद्या देऊ म्हणत वेळ काढली आहे. पाणी देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. पाणी तलावात लवकर नाही दिल्यास  बागायती क्षेत्रातील पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता माघार नाही. तलावात अपेक्षीत पाणी सोडेपर्यत आम्ही उपोषण मागे घेणार नसल्याची भुमिका उपोषण कर्त्याची आहे.दरम्यान जत म्हैसाळ योजनेचे उपविभागीय अभियंता एस.जे.शिंदे व सहाय्यक अभियंता ए.बी.कर्नाळे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली.शुक्रवारी सायंकाळ पासून कुंभारी येथून 160 क्युसेस इतक्या वेगाने शेगाव साठवण तलाव क्रमांक 2 मध्ये पाणी सोडण्यात येईल.या पाण्याध्ये दोन दिवसात वाढ होऊन ते 200 क्युसेस पर्यत वाढवू असे आश्वासन दिले. मात्र उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी 160 क्युसेस पाण्याचा फॉर्म्युला अमान्य केला.इतक्या कमी वेगाने पाणी तलावात येण्यास फार वेळ लागेल.तोपर्यंत पिके हातची जाणार आहेत. 200 क्युसेस पाणी देण्याचा आग्रह धरला.त्यामुळे निर्णय झाला नाही. उपोषण कर्त्या शेतकऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.अंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Rate Card

शेगाव तलावात म्हैशाळचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.