जत,(का.प्रतिनिधी):
अत्यंत वर्दळीच्या विजापूर-गुहाघर राज्य मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावर आता खड्डे पडायलाही जागा नाही. रस्त्याच्या झालेल्या चाळणीने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अतर्गंत या मार्गाची वाताहात झाली आहे.कुंभारी कडून काम चालू आहे.मात्र खरी रस्ता रूंदीकरण व दुरूस्तीची गरज असताना संबधित ठेकेदारांकडून ताजी जखम सोडून दुसरीकडे मलमपट्टी असा काहीसा प्रकार सुरू आहे.वास्तविक शहरातील रस्ता कधी कुणाचा जिव घेईल हे सांगता येत नाही अशा स्थितीत आहे. दुसरीकडे हाजारो रुपयाचा रोड ट्रक्स भरलेली छोट्या खड्ड्यात आदळून वाहनाची मोडतोड नित्याची झाली आहे. रस्ता पूर्णत: उखडला असून रस्त्याच्या चाळणीने वाहन धारकाच़्या कबरें,मान,मणक्याचे आजार बळावंत आहेत. जत तालुक्यातील धावडवाडी ते मुंचडी पर्यत जत तालुक्यातून जातो. जत शहरातून जात असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. तसेच दोन राज्याचे दळणवळण या महामार्ग वरून होत असल्याने अवजड वाहने मोठ्या संख्येने जा-ये करतात.गत उन्हाळय़ापासून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्याची तर अक्षरश: चाळणी झाली आहे. डांबर पूर्णत: उखडून गेले असून या रस्त्यावरून वाहनधारकांना चालताना मोठी कसरत करावी लागते. जत परिसरातून विजापूर,साताराला जाण्यासाठी अगदीजवळचा मार्ग म्हणून हा मार्ग ओळखला जातो. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. जत शहरातील रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. रस्त्याची प्रत्येक भाग,कडे ठिकठिकाणी खचले आहेेत. मोठा पाऊस झाल्यास या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते.अनेक ठिकाणी रस्ता पूर्णत: उखडला आहे. या रस्त्यावरून दुचाकी वाहन चालविताना वाहनधारक त्रस्त होऊन जातो. रस्त्यावरून चालण्यापेक्षा रस्त्याच्या बाजूने जाणेच वाहनधारक पसंत करतात. हा सर्व प्रकार राष्ट्रीय महामार्ग विभागाला माहीत असला तरी त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. यामुळे अपघाताची भीती वाढली असून वाहनधारक मात्र नाईलाजाने या मार्गावरून प्रवास करतात. यामुळे अनेक वाहने नादुरुस्त होऊन रस्त्याच्या कडेला उभी दिसतात. संबधित विभाग रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष का देत नाही हा संशोधनाचा विषय झाला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांच्या अंगावर मात्र काटा येतो.