जत | शिक्षकांच्या मागण्यासाठी माध्यमिक शिक्षक संघाचे शनिवारी सांगलीत निदर्शने अंदोलन | www.sankettimes.com

0
2

जत,प्रतिनिधी : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यासाठी शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी 5 मे 2018 ला सरकार विरोधात निदर्शने अंदोलन करण्यात येणार आहे. यात सर्व शिक्षक,कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघाचे कार्याध्यक्ष एम्.एम. मुजावर सर यांनी केले.

यासंदर्भाचे निवेदन संघाच्या वतीने संबधित विभागांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, वरिष्ठ व निवडश्रेणीच्या जाचक अटी रद्द कराव्यात,वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी 10 वर्षे,निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी 22 वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना पात्र ठरवावे.मासिक वेतन एक तारखेस अदा करावे,खाजगी, अंशत: व पुर्णत:अनुदानित संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना मे 2018 पासून मासिक देयके मंजूर करण्यासाठी आदेशित करावे,शालार्थ आय.डी.देणेबाबत प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्यांनी मान्यता देऊनही रखडले आहेत.त्यावर कारवाई करावी, प्रचलित पध्दतीप्रमाणे तोंडी/अंतर्गत मुल्यमापनाचे 20 गुण कायम ठेवावे.राज्यातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात,20 टक्के अनुदानित शाळा विना अट पुढील अनुदान मंजूर करावे.अशंदायी पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी आदी मान्यसाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर शनिवार ता.5 मेला लक्षवेधी निदर्शने अंदोलन करण्यात येणार आहे. त्यात सहभागी व्हावे असे आवाहन फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here