जत,प्रतिनिधी : जतचे कार्यसम्राट आमदार विलासराव जगताप यांच्या आज वाढदिवस उत्साहत साजरा करण्यात आला. गेल्या तीन दशकाहून जास्त काळ जतच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून राज्यभर परिचित असलेले आमदार यांना माननारा तालुक्यात मोठा वर्ग आहे.तालुक्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती,सोसायटीत त्यांच्या समर्थकांची सत्ता सामान्य स्थितीतून आमदार पदापर्यतचा त्याचे कार्य प्रेरणादायी आहे.त्यांचा 1 मे वाढदिवस मोठ्या उत्साहत साजरा करण्यात येतो.आज शहरात चार ठिकाणी पाणपोईचे उद्घाटने करण्यात आले. सकाळी सहा वाजलेपासून आमदार साहेबाना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी,अधिकारी, कार्यकर्ते,नागरिकांनी गर्दी केली होती. आमदार जगताप यांनी सर्वाच्या शुभेच्छा स्विकारल्या.
आमदार विलासराव जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पत्रकार किरण जाधव, बादल सर्जे व राजू माळी





