जत I वाळेखिंडी,हिवरेत दोन घटनेत किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी | www.sankettimes.com

0
10

जत,प्रतिनिधी : हिवरे ता.जत येथे झायलो गाडीच्या पैसे देणेघेणेवरून दोन गटात वाद झाला.दोघांनीही मारहाण झाल्याची परस्पर विरोधी तक्रारी जत पोलिसात दिल्या आहेत. बाळासो ईश्वरा वरगर(वय-45)यांने दिलेल्या फिर्यादीतं विजय तुकाराम खोत,व त्याचा एक अज्ञात मित्राने सत्तूरने मारहाण करून जखमी केले, असे म्हटले आहे.तर काकासो गुंडा पाटील रा.डिकसळ ता.सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीत बाळासो ईश्वरा वरगर,तानाजी बाळासो वरगर रा.हिवरे यांनी झायलो गाडीचे एक लाख देणेघेणेवरून वाद करत काठी,व कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद दिली आहे. दोन्ही गुन्हे जत पोलिसात दाखल झाले आहेत.

वाळेखिंडी विहिरीतील पाळीच्या वादातून मारामारी

जत,प्रतिनिधी : वाळेखिंडी ता.जत येथे विहिरीतील पाळीच्या वादातून दोन गटात मारामारी झाल्याच्या परस्पर विरोधी तक्रारी जत पोलिसात दाखल झाल्या आहेत. दादासो ज्ञानू पवार(वय-50,रा.वाळेखिंडी)यांनी दिलेल्या फिर्यादीत राहूल औंदूबर पवार रा.वाळेखिंडी,व आण्णा पवार घेरडी ता.सांगोला यांनी मिळून दगडाने मारहाण करून जखमी केले आहे.तर आण्णासो दत्तू पवार रा.घेरडी, सध्या वाळेखिंडी यांने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,दादासो ज्ञानू पवार, शहाजी दादासो पावर,तानाजी दादासो पवार रा.वाळेखिंडी यांनी विहिरीतील पाळीच्या वादातून दाताने चाऊन ता.28 सायंकाळी व ता.29 ला सकाळी जखमी केले तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे.दोन्ही गुन्हे जत पोलिसात दाखल झाले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here