जत | आज 108 गावात “तुफान” येणार ग्रामस्थ,शासकीय कर्मचाऱ्यांचे आज महाश्रमदान वाढविणार जलसंधारण | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी : पाणी फौंडेशनात भाग घेतलेल्या जत तालुक्यातील 108 गावात आज 1 मेची संधी साधत सर्वच गावात तालुक्यातील शासकीय कर्मचारी, ग्रामस्थाचे महाश्रमदान आयोजित केले आहे. यासंदर्भात जत महसूल प्रशासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना गावे वाटप करण्यात आली आहेत.जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जलसंधारणचे कामे श्रमदानातून होत आहेत.पाणी बानीचे महत्व समजलेले गावागावातील नागरिक एकवटले आहेत. त्यामुळे पाणी फाऊंडेशनच्या कामात मोठी गर्दी दिसत आहेत. दुष्काळ हटवायचा म्हणून प्रशासनही दक्ष झाले आहे. त्यामुळे तहसिलदार अभिजित पाटील स्व:त कुंटूबासह श्रमदानात सहभागी होऊन जनतेचा उत्साह वाढवत आहेत.जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनाही श्रमदानात सामावून घेण्यात येणार आहेत. तशा सुचना व गावे कर्मचाऱ्यांना वाटून देण्यात आले आहे.1 मेला त्यामुळे गावागावात तुफान येणार आहे. न भुतो ना भविष्यवती कामे करायचा चंग प्रशासनाने बांधला आहे.ध्वजवंदनानंतर सायंकाळ पर्यत श्रमदान करायचे आहे.प्रत्यकांनी पाण्याचे दुरभिष्य ओळंखून उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन तहसिलदार अभिजित पाटील यांनी केले आहे.
