माडग्याळ | सनमडीत आठवडा बाजार सुरू | www.sankettimes.com
माडग्याळ,वार्ताहार: सनमडी(ता.जत) मध्ये अक्षयतृत्तीयाचा मुहूर्तांवर बुधवार ता.18 पासून आठवडा बाजार सुरू झाला. सनमडी गावलगत असणारे कुणीकुणूर,मायतळ, घोलेशवर या गावाना आठवडा बाजार फायदेशीर ठरणार आहे. सनमडी येथे दवाखाना, मेडिकल, अनेक सुविधा झालेल्या आहेत. त्या शाळेचीही चांगली सोय आहे. आठवडा बाजाराचे उद्घाटन माजी आमदार उमाजी सनमडीकर यांच्या हस्ते झाले. माजी पं. सं. सदस्य सुनील पवार,माजी सैनिक व जेष्ठ नागरिक, पाणी फाऊंडेशन समिती सदस्य, नरसिह मेडिकलचे मालक नरसिह जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सध्या सनमडीकरांना माडग्याळ, जत येथे आठवडा बाजारासाठी जावे लागत होते. सनमडी येथे बाजार भरविण्यात आल्याने ग्रामस्थाचा वेळ व खर्च वाचणार आहे.
बाजारात शेतमाल,भाजीपाला, भुसारीसह अनेक साहित्य उपलब्धं झाले आहे.

सनमडी ता.जत येथील पहिल्या आठवडा बाजारात खरेदीसाठी उडालेली झुंबड