जत,प्रतिनिधी:संत निरंकारी मंडळ शाखा जतच्यावतीने 30 एप्रिल रोजी रक्तदान शिबीर व समागमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाखा प्रमुख जोतीबा गोरे व दत्ता साळे यांनी दिली.
सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या प्रेरणेने संत निरंकारी चैरिटेबल फौंडेशन शाखा जतच्यावतीने महा रक्तदान शिबीर 30 एप्रिल रोजी एस्.आर.व्ही.एम्.हायस्कुल जत येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत होत आहे. तसेच सायंकाळी 6.30 ते 10 या वेळेमध्ये तहसिल कार्यालय मैदान येथे प.पु रोशनलाल , केंद्रीय ग्यानप्रचारक दिल्ली यांचे प्रमुख उपस्थितीत आध्यात्मिक संत निरंकारी मिनी समागम सत्संग सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सांगली,सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे व कर्नाटक राज्यातुन हजारो भक्तगण उपस्थित राहणार आहेत तरी या दोन्ही आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ परिवारासह सर्वांनी घ्यावा असे आवाहन जत ब्रँच मुखी गोरे,सेवादल संचालक संभाजी साळे, तसेच सेवादल संचालिका संज्योती साळुंखे यांनी केले.
जत येथे 30 एप्रिलला होणाऱ्या समागम सोहळ्याची तयारी जत शाखेच्या वतीने करण्यात आली







