दरिबडची | जतच्या गणेश टेंगलेची यूपीएससीत बाजी | www.sankettimes.com
दरिबडीतून आमचे वार्ताहर उमेश बिराजदार यांचा स्पेशल रिपोर्ट
दरिबडची सारख्या अंत्यत दुष्काळी गावातील ऊसतोड मजूराचा मुलगा देशात चमकला
दरिबडची,वार्ताहर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी जाहीर केलेे.यात जत तालुक्यातील गणेश महादेव टेंगले यांनी बाजी मारली आहे. टेंगले याला 615 वी रॅँक मिळाली आहे.गणेश टेंगले याने दुष्काळाचा सामना करत झालेले शिक्षण आणि ऊसतोड मजुराचा मुलगा असलेल्या गणेशच्या यशाने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.जत पासून सुमारे 30 किलोमीटर वर असलेल्या दरिबडचीतील गणेशचे यश जतचे भविष्य उज्वल करणारे आहे.दरिबडची नजिक असणाऱ्या टेंगलेवस्ती येथे गणेशचे एकच पडझड झालेल्या मराठी शाळेत शिक्षण झाले आहेत. ज्या गावाला डांबरी रस्ता नाही,बस जात नाही.प्राथमिक सुविद्याचाही वणवा आहे.अशा टेंगलेवाडीतील गणेश टेंगले देशातील प्रशासकीय सेवेत क्लासवन अधिकारी झाला आहे. जेथे भविष्य बघणेही कठिण अशा भागातून आलेल्या गणेशचे यश टेंगलेवाडीतीलच नव्हे तर संपुर्ण जत तालुक्यातील युवा पिठीला प्रेरणा देणार ठरणार आहे.
गणेशचे बारावीपर्यंतचे शिक्षण दरीबडची येथे झाले, तर त्यानंतर कोल्हापूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. तीन प्रयत्नानंतर त्याला यश मिळाले आहे. गणेशचे भाऊ तानाजी महादेव टेंगले हे औरंगाबाद जिल्हात प्राथमिक शिक्षक असून अत्यंत कष्टातून दोघांनीही शिक्षण पूर्ण केले आहे.जतसारख्या दुर्लक्षीत तालुक्यातील गणेशच्या यशाने नव्या तरूणांना प्रेरणा मिळणार आहे. दरिबडचीत गणेशचे कुंटुबिय सामान्य परिस्थिती राहतात.गणेशची अधिकारी व्हायची महत्वकांक्षा त्यांना येथवर पोहचवली आहे.गेल्या चार वर्षांपासून तो दिल्ली येथे युपीएससीची तयारी करत होता. हा त्याचा तिसरा प्रयत्न होता. अखेर शुक्रवारी त्याच्या प्रयत्नाला यश मिळत त्याने परीक्षेत बाजी मारली.मराठी माध्यमातून शिकणाऱ्या अनेकांना न्यूनगंड वाटत होता. मात्र, आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी टक्का वाढत आहे. सध्या मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांचे आकर्षण वाढत असून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, हे स्वागतने दाखवून दिले आहे. ग्रामीण भागातूनच आलेल्या गणेशचे यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
गणेश टेंगले यांचे टेंगलेवाडीतील घर साखर वाटून
आंनद साजरा करताना टेंगले कुंटुबिय
