डफळापूर |श्री.बुवानंद पिराचा ऊरूस 16 ते 18 मेला,नियोजनाचा नारळ फुटला | www.sankettimes.com

0
8

डफळापूर,वार्ताहर : येथील श्री.बुवानंद पिराचा ऊरूस सालाबादप्रमाणे 16,17,18 मे ला होत आहे.नियोजना संदर्भात ऊरूस कमिटीच्या वतीने गुरूवार ता.25 नारळ फोडून सुरूवात केली.

त्यात ऊरूसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सालाबादप्रमाणे सर्वांनी एकत्र येत हा ऊरूस शांततेत साजरा करायाचा आहे.ऊरूसाच्या नियोजनाचा गुरूवार 25 एप्रिलला नारळ फोडण्यात आला. सर्व मतभेद,पक्ष विसरून ऊरूस मोठ्या उत्साहत साजरा करण्यासाठी सर्वांनी ऊरूस कमिटीस सहकार्य करावे असे आवाहन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे बुवानंद दर्ग्यामध्ये गुरूवार ता.24 पासून सुरूवात करण्यात आली.यावेळी माजी सभापती मन्सूर खतीब, कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, विलास माने,संभाजी माळी,जे के माळी,हुसेन आत्तार,प्रा.बि.आर.पाटील,शंकरराव गायकवाड

 राजाराम माने, तानाजी चव्हाण,धोंडिराम माळी,उपसंरपच प्रतापसिंह चव्हाण,युवकनेते सज्जनराव चव्हाण,परशुराम चव्हाण,बाळासाहेब शांत,विठ्ठल कोळी, बंडू पाटील,सतिश भोसले,प्रविण पाटील, अब्दुल मकानदार,दयानंद वाघमारे,दिलिप शेलार,डिंगू माने,भानुदास गडदे,बाजीराव चव्हाण, माधवराव चव्हाण, सुरेश संकपाळ,दिनकर चव्हाण,प्रमोद परूळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here