जत | दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटलाय, तुम्हीही सहभागी व्हा! | www.sankettimes.com

0


जत,प्रतिनिधी : ग्रामीण भागातील लोक गट-तट आणि मतभेद विसरुन पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपसाठी श्रमदान करीत आहेत. दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटला आहे. या मोहिमेत शहरातील नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी पाणी फाउंडेशनने ‘जलमित्र’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत सहभागी व्हा आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करा, असे आवाहन प्रांताधिकारी तुषार ढोंबरे व तहसिलदार अभिजित पाटील यांनी केले. 

प्रांताधिकारी ढोंबरे, व तहसिलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची,संघटना,असोशिएशनचे पदाधिकारी यांची बैठक झाली. त्याच सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी फौंडेशनच्या 1 मेच्या महाश्रमदानात सहभागी होऊन पाणी अडविण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.संघटनेच्या सोयीनुसार त्यांना श्रमदानासाठी गावे वाटून देण्यात आली आहेत.पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. तालुक्यांतील 109 गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. पाणी फाउंडेशन गावकऱ्यांना सहभागी करुन घेते, त्यांना ज्ञान देते आणि त्यांच्याकडून श्रमदान करुन घेते.योग्य पध्दतीच्या वैज्ञानिक दुष्टिकोनातून गावागावात कामे सुरु आहेत. ग्रामसेवक, कृषी अधिकारी मुक्कामी आहेत. पूर्वी ग्रामसेवक सापडत नव्हता. परंतु, तो आता यात सहभागी झालेला दिसतोय. जी गावे श्रमदान करीत आहेत त्यांना जलमित्र मोहिमेच्या माध्यमातून आणखी मदत मिळू शकते. शहरातील माणसांनाही यात सहभागी होता येऊ शकते. या उपक्रमाच्या घोषणेनंतर 1 लाखापेक्षा अधिक जलमित्रांनी सहभाग नोंदविला आहे. 1 मे रोजी महाश्रमदान करायचे आहे. 

श्रमदानातून जतला पाणीदार करण्यासाठी  स्व:ता तहसिलदार अभिजित पाटील भल्या पहाटे व सायंकाळी उशिरापर्यत श्रमदानात सहभागी होत आहेत.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.