पत्नीचे अपहरण केल्याची पतीची पोलिसात तक्रार | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी : येळवी ता.जत येथील एका विवाहितेस फुस लावून पळवून नेहल्याची तक्रार पतीने जत पोलिसात दिली आहे. याप्रकरणी आबा रावसाहेब दौलतडे रा.नंदेश्वर ता.मंगळवेडा यांच्या विरोधात पत्नीचे अपहण केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
अधिक माहिती अशी येळवी येथील विनायक रामचंद्र रुपनूर (वय-28)यांचे दोन महिन्यापुर्वी नंदेश्वर येथील मुलीशी लग्न झाले होते.दरम्यान मंगळवारी सायंकाळी 8.30 च्या सुमारास पत्नी शौच्छास जातो म्हणून घराबाहेर पडली होती. बराच वेळ पत्नी परत आली नाही.म्हणून शोधाशोध केली असता काही नागरिकांनी सांगितले वरून संशियत आरोपीने तिला फुस लावून मोटारसायकलीवरून पळवून नेहल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सा.पोलिस निरिक्षक डोंगरे करत आहेत.