जत | कोंतेबोबलाद ग्रामपंचायत निवडणूकीच्या पाश्वभुमीवर राडा | www.sankettimes.com

0

 

परस्पर विरोधी तक्रारी दाखल : आमदार पुत्रावर हल्ला, विरोधात उभे राहिल्याच्या वादातून उमेदवारांस मारहाण

जत,प्रतिनिधी :  

कोंतेबोबलाद (ता.जत) येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील रणसंग्रामा अगोदर जोरदार राडा झाला.राड्यानंतर आमदार गट व सांवत गटाच्या परस्पर विरोधी तक्रारी उमदी पोलिसांत दाखल झाल्या आहेत.अतिसंवेदनशील व आमदार विलासराव जगताप यांचे गाव असलेल्या कोंतेबोबलाद मधील सर्वच निवडणूका अटीतटीच्या व टोकाच्या संघर्षाच्या होत आहेत. यापुर्वीही निवडणूकीतील वादातून हाणामारी झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतही त्याचा प्रत्यय आला आहे.गतवेळी दोन्ही गटांनी एकत्र येत बिनविरोध निवड झाली होती.सोसायटी निवडणूकीपासून पुन्हा दोन्ही गटात उभा संघर्ष सुरू आहे. अनेक निवडणूकां टोक्याच्या झाल्या आहेत. यंदा ग्रामपंचायती सत्ता मिळावी म्हणून दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. त्यामुळे संघर्ष निश्चित आहे.या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत.

दरम्यान संरपच पदासाठी विरोधात उभे राहिल्याचे कारणावरून श्रीशैल सिदाप्पा कांबळेसह चौघांना 

जातीवाचक शिवीगाळ करत आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज जगतापसह नऊ जणांनी मारहाण केल्याचा गुन्हा उमदी पोलिसांत दाखल झाला आहे. याप्रकरणी जखमी श्रीशैल सिदाप्पा कांबळे रा.कोंतेबोबलाद यांनी फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी, कोंतेबोबलाद ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. त्यात आमदार जगताप व कॉग्रेस नेते विक्रम सांवत गटात थेट लढत होत आहे.निवडणूकीत टोकाचा संघर्ष सुरू आहे.त्यात फिर्यादींनी थेट संरपच पदासाठी विरोधी गटाकडून अर्ज दाखल केला आहे. त्यांचा राग मनात धरून,श्रीशैल कांबळे, माणिक पुंडलिक कांबळे, भिमाण्णा सेदाप्पा कांबळे, सेदाप्पा कांबळे यांना सात जणांनी जातीवाचक शिवीगाळ करत,आमच्या विरोधात निवडणूकीत उभे राहतायं म्हणत बेल्ट,काठी,लाथाबुक्यांनी घरात घुसून मारहाण केली आहे. याबाबत कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत एमएच- 13,एझेड-3627 या गाडीवरून आलेले मनोज विलासराव जगताप, रमेश एकनाथ जगताप,तुकाराम प्रकाश जगताप, नवनाथ उत्तम जगताप, शिवाजी यशवंत जाधव,धैर्यशील चंद्रहास जगताप, अमर चंद्रहास जगताप, गोपाळ बाळकृष्ण जगताप, कुलदीप जनार्दन जगताप रा.कोंतेबोबलाद यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.दरम्यान घटनास्थळी डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे,सा. पोलिस निरिक्षक भगवान शिंदे,प्रविण संपागे यांनी भेट देत तपास सुरू केला आहे.दरम्यान मनोज विलासराव जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी भिवा करे,महेश भिवा करे,मुरलीधर सुबराव जगताप,शंकर मारुती सावंत,गणपती सर्जेराव जगताप,श्रीशैल सेदाप्पा कांबळे,पुंडलिक बसपा कांबळे,गणपती महादेव जगताप,बाळासो सर्जेराव जगताप सर्व रा. कोतेबोबलाद यांच्याविरोधात उमदी पोलीसांत तक्रार दाखल झाली आहे.कोतेबोबलाद गावी दलित वस्तीजवळ अंगणवाडी समोरील रोडवर         

वरील नऊजणांनी दगडाने हल्ला करून बोलेरो गाडीचे नुकसान केले. या हल्ल्यात गोपाळ जगताप,कुलदीप जगताप,शिवाजी जगताप हे जखमी झाले.ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून फिर्यादीची बोलेरो गाडीवर दगडफेक केली. जीवे मारण्याची धमकी दिली आहे.असे तक्रारीत म्हंटले आहे.अधिक तपास प्रविण संपांगे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.