जत | बेवनूर मधील ग्रामसेवकाची बदली रद्द करा | www.sankettimes.com

0

उपसरपंचासह सदस्यांचे बीडिओंना निवेदन 

जत,प्रतिनिधी :बेवनूर (ता.जत) ग्रामपंचायतीचा कारभार चांगला सुरू असताना खोट्या आरोपांखाली ग्रामसेवकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ग्रामसेवकांची कोणतीही चौकशी न करता ही बदली झाली आहे.संरपचांनी ही बदली केल्याचा पदाधिकारीचा आरोप आहे.

अशा प्रकाराने चांगल्या अधिकाऱ्याची बदली केल्यास ग्रामपंचायतीचे कामकाज होवू देणार नसल्याचा इशारा उपसरपंचासह सदस्य व ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदन जतचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांना देण्यात आले. तर प्रशासनाच्या या मनमानी कारभारा विरोधात बेवनूर ग्रामपंचायतीसमोर उपोषण बसणार असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर उपसरपंच वर्षा नाईक, सदस्य रमाबाई गायकवाड, मंगल सरगर, बाळासो देवकर, नानासो शिंदे, दत्ता काळेल, तुकाराम नाईक, तानाजी सरगर, आण्णासो शिंदे, विजय नाईक, बबन शिंदे आदींच्या सह्या आहेत. 

निवेदनात पुढे म्हंटले आहे की, जानेवारी मध्ये ग्रामपंचायतीचा सर्वानुमते एक ठराव झाला. तो पुढील मासिक सभेत कायम ठेवण्यात आला. 

त्याला संरपचाचा विरोध होता.त्या कारणावरून ग्रामसेवकाची बदली झाल्याचा सदस्याचा आरोप आहे.या प्रकाराची वस्तुस्थिती प्रत्यक्षात वरिष्ठांनी तपासून कार्यवाही करावी अन्यथा दुसर्‍या ग्रामसेवकाची नेमणूक केल्यास कामकाज बंद पाडू असा इशारा ही निवेदनात देण्यात आला आहे. दरम्यान जत पंचायत समिती मासिक सभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवींद्र सावंत यांनी बेवनूर, खैराव, रेवनाळ, बागेवाडी आदी गावातील ग्रामसेवकांच्या तक्रारी नसताना बदली करण्यात आली आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला, यावर बीडिओ संजय चिल्लाळ यांनी ग्रामसेवकांच्या सर्वच बदलीला स्थगिती दिली. तसा ठराव ही सभेत घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.