जत,प्रतिनिधी : जत शहरातील विठ्ठल नगर येथील जनाबाई बाळासाहेब तुरेवाले यांच्या राहत्या घरी दरवाज्या उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्यानी 65 हाजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. घटना शनिवारी रात्री घडली.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, जत शहरातील विठ्ठल नगर मधील तुरेवाले वस्तीत मध्यवर्ती ठिकाणी जनाबाई तुरेवाले यांचे घर आहे.रात्री उखाडा जास्त असल्याने त्या घराचा दरवाज्या उघडा ठेवून झोपी गेल्या होत्या.उघड्या दरवाज्याचा फायदा घेत चोरट्यानी घरात प्रवेश करत 6 हाजार रोख,सोन्याचे दागिणे,किंमती साड्या असा 65 हाजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी हा प्रकार लक्षात आल्याने जनाबाई तुरेवाले यांनी जत पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास सा.पोलिस निरिक्षक आप्पासाहेब कत्ते करत आहेत.
जत: तुरेवाले वस्तीत जनाबाई तुरेवाले यांच्या घरातील चोरट्यांनी विस्कटलेले साहित्य



