डफळापूर | जमिनीच्या वादातून एकावर खूनी हल्ला | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी : डफळापूर(ता.जत) येथे जमिनीच्या वादातून एकावर खूनी हल्ला करण्यात आला. त्यात शंकर पांडूरंग कोरे(न्हावी) हे गंभीर जखमी झाले आहेत. कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव कल्लाप्पा परीट यांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.घटना शनिवारी साडेआठच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, डफळापूर तलावाच्या पाठीमागे काळेशिवार रोड लगत कोरे व परीट यांची लगत जमीन आहे.जमिनच्या हद्दीतील वादातून दोघांत अनेकवेळा किरकोळ वाद झाले आहेत.शनिवारीही परीट यांने बांधावरील झाड तोडले होते.त्यांचा कोरे यांनी जाब विचारल्याच्या कारणावरून परीट यांनी कोरे यांच्यावर कोत्यांने डोक्यात,तोंडावर,डाव्या बाजूचा गळा,छाती,डाव्या पायावर,उजव्या माडंवीर वार केले.त्यात कोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान पोलिसांनी कोरे यांचा जबाब घेऊन गुन्हा नोंद केला आहे. आरोपीस रात्री उशिरापर्यत अटक नव्हती. सा.पोलिस निरिक्षक विजय चव्हाण अधिक तपास करत आहेत.