संख,वार्ताहर: सोनलगी (ता.जत) येथे वाळू तस्करी करणारा ट्रक्टर वाळू जप्त करण्यात आली. तर ट्रक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.पथकाने गुरूवारी मध्यरात्री ही कारवाई केली.
वाळू तस्कर बसवराज चिंदानंद केरूर यांच्या मालकीचा विना नंबर असलेला ट्रक्टर संख अप्पर तहसिल कार्यालयाच्या गस्ती पथकातील कर्मचाऱ्यांनी पकडला.नविन नियमाप्रमाणे सुमारे दीड लाख रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईत तहसिलदार नागेश गायकवाड, संख तलाठी नितिन कुंभार,अनिल हिप्परकर, हणमंत बामणे,विलास चव्हाण, औंदुबर चव्हाण,कामकाज चव्हाण यांनी भाग घेतला. ट्रक्टर पकडण्यासाठी उमदी पोलिस व बालगातील ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्याचे तहसिलदार गायकवाड यांनी सांगितले.





